Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक कर्मचाऱ्यांचा बुधवारी संप

बँक कर्मचाऱ्यांचा बुधवारी संप

बँक कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या ७ जानेवारी रोजी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

By admin | Published: January 2, 2015 12:04 AM2015-01-02T00:04:30+5:302015-01-02T00:04:30+5:30

बँक कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या ७ जानेवारी रोजी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Bank employees contract on Wednesday | बँक कर्मचाऱ्यांचा बुधवारी संप

बँक कर्मचाऱ्यांचा बुधवारी संप

मुंबई : बँक कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या ७ जानेवारी रोजी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पगारवाढीसह अन्य मागण्या मान्य न झाल्यास चालू महिन्यातच अनेक दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
‘वेतनवाढीच्या मागणीवर आमची भारतीय बँक महासंघाशी चर्चेची १० वी फेरी सुरु आहे. ७ जानेवारीपुर्वी यावर तोडगा निघावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ अशी माहिती युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सचे समन्वयक विश्वास उटगी यांनी येथे पत्रकारांना दिली. युएफबीयू ही कर्मचारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या नऊ संघटनांचा महासंघ आहे. बँकेच्या मिळकतीशी पगारवाढीचा मेळ घालण्याची त्यांची मागणी आहे.

केली आहे.
‘आम्ही २३ टक्के पगार वाढीची मागणी असून भारतीय बँक असोसिएशनने ११ टक्के वाढीची तयारी दर्शविली आहे,’ असे उटगी म्हणाले. भारतीय बँक असोसिएशन ही बँकांची व्यवस्थापन यंत्रणा असून ती सरकार आणि विविध संघटनांमध्ये मध्यस्थी करत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Bank employees contract on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.