Join us

बँक कर्मचारी पुन्हा संपावर, नागरिकांची मोठी गैरसोय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 6:33 AM

हा संप झाल्यास बँका सलग तीन दिवस बंद राहतील. कारण त्याआधी २५ जूनला चौथा शनिवार आणि २६ जूनला रविवार असल्यामुळे बँका बंदच असणार आहेत.

सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या २७ जून रोजी एक दिवसाचा संप करण्याची घोषणा केली आहे. नऊ बँक संघटनांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

हा संप झाल्यास बँका सलग तीन दिवस बंद राहतील. कारण त्याआधी २५ जूनला चौथा शनिवार आणि २६ जूनला रविवार असल्यामुळे बँका बंदच असणार आहेत. त्यानंतर सोमवारी संपामुळे बँका बंद राहतील. बँका सलग तीन दिवस बंद राहिल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होऊ शकते.

खासगी क्षेत्रात बहुतांश मोठ्या कंपन्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा हा नियम लागू आहे.  खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सप्ताहात दोन दिवस सुट्या देत असतील तर सरकारला काय अडचण आहे?, सरकारन मागणी मान्य न केल्यास संप करण्याचा इशारा यूएफबीयूने दिला आहे.

टॅग्स :बँकसंपव्यवसाय