मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाविरोधात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी शेकडो कर्मचारी व अधिकारी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली बुधवारी आझाद मैदानात एकटवले होते. सरकार जबरदस्तीने बँकांचे विलीनीकरण करत असल्याचा आरोप करत, पुढील आठवड्यात बैठक घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी या वेळी दिला.मुंबई महानगरातील बँक कर्मचारी, तसेच अधिकाºयांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर सकाळी ११ वाजता निदर्शनास सुरुवात केली. या वेळी युनायटेड फोरमच्या पदाधिकाºयांनी सरकारी धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. बँकांचे एकत्रिकरण बँक ग्राहकांच्या, कर्मचारी, तसेच अधिकाºयांच्या हिताचे नसल्याचा आरोप तुळजापूरकर यांनी केला.सार्वजनिक क्षेत्रातील बँकातून या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा युनियनने केला आहे. मुंबईतील बहुतेक बँकांच्या शाखांचे शटर बुधवारी सकाळपासून बंद दिसले. अर्धवट शटर उघडे असलेल्या बँक शाखेत सफाई कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे रोख रक्कम भरणे-काढणे, धनादेश वठणावळ असे सर्व व्यवहार ठप्प पडले होते.२१ बँकांतील कर्मचाºयांचा दिल्लीत संपनवी दिल्ली : विजया बँक आणि देना बँकेच्या बँक आॅफ बडोदामधील नियोजित विलिनीकरणाच्या विरोधात देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाºयांनी बुधवारी संप केला. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने (युएफबीयु) या संपाचे आवाहन केले होते. २१ बँकांतील १० लाख बँक कर्मचारी व अधिकारी आपले सदस्य असल्याचा दावा युएफबीयुने केला आहे.
विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी मैदानात, पुढील आठवड्यात बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 5:24 AM