Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक कर्मचाऱ्यांचा दोन सप्टेंबरला देशव्यापी संप

बँक कर्मचाऱ्यांचा दोन सप्टेंबरला देशव्यापी संप

कामगार कायद्यांमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणांच्या निषेधार्थ आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) २ सप्टेंबर रोजी देशव्यापी

By admin | Published: July 10, 2015 01:02 AM2015-07-10T01:02:55+5:302015-07-10T01:02:55+5:30

कामगार कायद्यांमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणांच्या निषेधार्थ आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) २ सप्टेंबर रोजी देशव्यापी

Bank employees' nationwide exposure on September 2 | बँक कर्मचाऱ्यांचा दोन सप्टेंबरला देशव्यापी संप

बँक कर्मचाऱ्यांचा दोन सप्टेंबरला देशव्यापी संप

राजकोट : कामगार कायद्यांमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणांच्या निषेधार्थ आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याची धमकी दिली आहे.
एआयबीईएचे महासचिव सी.एच. वेंकटचलम यांनी गुरुवारी येथे सांगितले की, कामगार कायद्यांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांना विरोध म्हणून २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचे आवाहन आम्ही बँक कर्मचाऱ्यांना केले आहे. सहकारी, खासगी व विदेशी बँकांचे जवळपास ५ लाख कर्मचारी या संपात सहभागी होतील. कामगार कायद्यातील संभाव्य बदल भांडवलदार धार्जिने आहेत.

Web Title: Bank employees' nationwide exposure on September 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.