Join us

बँक कर्मचाऱ्यांचा दोन सप्टेंबरला देशव्यापी संप

By admin | Published: July 10, 2015 1:02 AM

कामगार कायद्यांमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणांच्या निषेधार्थ आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) २ सप्टेंबर रोजी देशव्यापी

राजकोट : कामगार कायद्यांमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणांच्या निषेधार्थ आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याची धमकी दिली आहे.एआयबीईएचे महासचिव सी.एच. वेंकटचलम यांनी गुरुवारी येथे सांगितले की, कामगार कायद्यांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांना विरोध म्हणून २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचे आवाहन आम्ही बँक कर्मचाऱ्यांना केले आहे. सहकारी, खासगी व विदेशी बँकांचे जवळपास ५ लाख कर्मचारी या संपात सहभागी होतील. कामगार कायद्यातील संभाव्य बदल भांडवलदार धार्जिने आहेत.