नवी दिल्लीः संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2019-20मधून सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी गोष्ट बाहेर आली आहे. या सर्वेक्षणातून सरकारी बँका आपल्या कर्मचाऱ्यांना बँकेच्या समभागात भागीदार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बँकांनाही मोठा फायदा होणार आहे. सार्वजनिक बँकांमधल्या कर्मचाऱ्यांसाठी ई-सॉप म्हणजेच त्या त्या बँकेचे समभाग कर्मचाऱ्यांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे कर्मचारी हे त्या बँकेचे मालक होतील आणि त्यांच्यामध्ये जोखीम उचलण्याची भावना निर्माण होईल, असं अर्थतज्ज्ञांना वाटतं. तसेच त्यांचं कामकाजातही पहिल्याच्या तुलनेत फार सुधारणा होईल, अशीही अटकळ बांधली जात आहे.
काय आहे ESOPs योजना- एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लान (ईएसओपी) ही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना कंपनीच्या समभागात भागीदार बनवता येणार आहे. इतर योजनांच्या तुलनेत ईएसओपी कर्मचाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीशी जोडण्याकरिता परदेशात या योजनेचा सर्रास वापर केला जातो. ही योजना आयटी कंपनीत जास्त प्रभावी आहे. परदेशात ईएसओपीमधल्या 'ओ'चा अर्थ मालकी हक्क असा आहे. प्रमोटरला कोणतंही शुल्क न देता सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला शेअर्स विकत घेता येणार आहेत. भारतात कंपन्यांचा दर्जा आणि कामकाज सुधारण्यासाठी ईएसओपी योजनेचा आता वापर केला जाणार आहे.
Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणात सामान्यांना दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल
Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीने दिला पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला मोठा झटका
संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालात 2020च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच आर्थिक वर्षं 2021मध्ये अर्थव्यवस्था आणखी भक्कम होणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्थिक सर्वेक्षणात जुलै-सप्टेंबर 2019मध्ये जीडीपी वाढ 4.5 टक्के राहिला आहे. जी 2013नंतर सर्वात नीचांकी स्तरावर राहिली आहे.
Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी
Budget 2020: नोकरीच्या शोधात आहात?... आर्थिक सर्वेक्षणातील 'हा' आकडा देईल मोठा आधार