जर तुम्हाला एफडीद्वारे मोठा परतावा (FD Interest Rates) मिळवायचा असेल, तर अनेक बँका तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आल्या आहेत. ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. या मर्यादित कालावधीसाठी सुरू केलेल्या योजना आहेत. म्हणूनच तुम्ही त्यांचा फायदा लवकरात लवकर घेऊ शकता. आयडीबीआय बँक, एसबीआय बँक आणि इंडियन बँक यासारख्या इतर बँकांनी विशेष एफडी योजना आणल्या आहेत. पाहूया जबरदस्त रिटर्न देणाऱ्या एफडींबाबत.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी एक खास एफडी योजना लाँच केली आहे. सामान्य नागरिकांसाठी 35 आणि 55 महिन्यांच्या कालावधीसाठी ही योजना असेल. यामध्ये 35 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.20 टक्के आणि 55 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.25 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आलाय. ज्येष्ठ नागरिकांबद्दल सांगायचं तर, 35 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.60 टक्के आणि 55 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.75 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडिया
बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांसाठी मान्सून डिपॉझिट स्कीम सुरू केली आहे. सामान्य ग्राहकांसाठी, बँकेनं या कालावधीसाठी सुरू केलेल्या एफडीचा मॅच्युरिटी कालावधी 7 दिवस ते 10 वर्षांच्या दरम्यान ठेवला आहे. ज्यावर 3 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देण्यात येतो. यामध्ये सर्वाधिक व्याजदर 7.25 टक्के निश्चित करण्यात आलाय.
याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियानं अमृत कलश नावाचा विशेष एफडी प्लॅन सुरू केला होता. जो 15 ऑगस्ट 2023 रोजी संपत आहे. आयडीबीआय बँकेद्वारे चालवली जाणारी अमृत महोत्सव एफडी योजनादेखील 15 ऑगस्ट 2023 रोजी संपत आहे. ही स्कीम 444 दिवस आणि 375 दिवसांच्या कालावधीसाठी चालवली जात आहे.