Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank FD Vs Post Office TD: गुंतवणूक बँकेत करावी का पोस्टात? कुठे मिळेल चांगला परतावा?

Bank FD Vs Post Office TD: गुंतवणूक बँकेत करावी का पोस्टात? कुठे मिळेल चांगला परतावा?

मुदत ठेवींबद्दल माहिती जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 06:26 PM2022-07-22T18:26:27+5:302022-07-22T18:35:58+5:30

मुदत ठेवींबद्दल माहिती जाणून घ्या...

Bank FD Vs Post Office TD where Should invest money bank or post office good returns | Bank FD Vs Post Office TD: गुंतवणूक बँकेत करावी का पोस्टात? कुठे मिळेल चांगला परतावा?

Bank FD Vs Post Office TD: गुंतवणूक बँकेत करावी का पोस्टात? कुठे मिळेल चांगला परतावा?

पुणे : पैसा गुंतवायचा असेल तर सध्या मार्केटमध्ये अनेक पर्याय आहेत. त्यात मुच्युअल फंड, शेअर मार्केट, तसेच मुदत ठेव अर्थात एफडी (Fixed Diposit), यांचा समावेश आहे. परताव्याची हमी आणि व्याजदर निश्चित असल्याने एफडीतील गुंतवणूक ही सध्या सर्वात लोकप्रिय ठरत आहे. भारतीयांचा विचार केला तर ठेवीदारांचा पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये मुदत ठेव ठेवण्यावर जोर दिसतो. साधारणतः बँकांमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवीला बँक एफडी (Bank FD) आणि पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवीला पोस्ट ऑफिस टर्म डिपॉसिट (Post Office Term Deposits किंवा TD) म्हणतात. पोस्ट ऑफिससोबत बँकांमध्येही एफडीवर आकर्षक व्याजदर मिळतो.  

एफडी किंवा टीडीसारख्या योजनामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर लाभ मिळतो. केवळ कर लाभासाठी तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ते टाळलं पाहिजे. कारण तुमची गुंतवणूक तुमच्या वैयक्तिक आर्थिक धोरणांशी देखील जुळली पाहिजे. तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या FD किंवा TD तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी असावी. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी TD आणि FD विषयी अधिक माहिती जाणून घेतली पाहिजे.

बँक एफडी (Bank FD)-
बँक मुदत ठेवीवर (Bank FD) मिळणाऱ्या व्याजावर किमान 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर गुंतवणूकदाराच्या कर गुंतवणुकीनुसार (Tax Bracket) कर आकारला जातो. जर एखाद्या एफडीसाठी गुंतवणूक संयुक्तपणे (Joint Account) केली असेल तर फक्त FD पावतीवर नमूद केलेल्या पहिल्या गुंतवणुकदाराला कर लाभ मिळतात. करबचत एफडीवर, गुंतवणूकदार संचयी (cumulative interest) आणि असंचयी (non-cumulative interest) व्याज पर्याय निवडू शकतात. पाच वर्षांचा लॉक-इन टर्म असलेल्या कर बचत एफडीमधून मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी नसते.

बँकव्याज दर (टक्के)
इंडसइंड बँक6.50
आरबीएल बँक6.30
आयडीएफसी फर्स्ट बँक6.25
येस बँक6.25
डीसीबी बँक6.25

महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बहुतांश बँकांकडून अतिरिक्त 0.50% व्याज मिळते. स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या (SBI) काही बँका देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ऑफर करतात.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTS)-

POTS ला नॅशनल सेव्हिंग टीडी खाते असंही म्हणतात. ज्याप्रमाणे भारतीय प्राप्तीकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत बँक एफडीवर प्राप्तीकरामध्ये सुट मिळते त्याप्रमाणे 5 वर्षांच्या मुदत ठेव खात्यासाठी योजनेत केलेली ठेव प्राप्तिकर कपातीसाठी पात्र ठरते.

पोस्टात केलेल्या टीडीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ती रक्कम मॅच्यूअर होण्यापूर्वी काढणे शक्य नसते. कर कपात टीडीमध्ये तुम्ही पूर्ण रक्कम लवकर काढू शकत नाही किंवा त्यातील काही पैसेही घेऊ शकणार नाही. हे बँकेच्या मुदत ठेवीच्या विरुद्ध आहे, जे कधीही काढले जाऊ शकते. POTD मध्ये चार गुंतवणुकीच्या कालावधीत आहेत, त्यामध्ये एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे असा कार्यकाळ आहे.

कालावधीव्याज दर (टक्के)
1 वर्ष5.50
2 वर्ष5.50
3 वर्ष5.5
5 वर्ष6.7

यावरून बँकांकडील एफडी आणि पोस्ट ऑफिसमधील टीडीमध्ये बर्‍याच प्रमाणात साम्य आहे. तरीही, या दोन्हींमध्ये काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. बँक एफडी वैयक्तिक बँकांद्वारे नियंत्रित केल्या जातात, त्यामुळे याचे व्याज दर ते बदलू शकतात.

पोस्ट ऑफिस टीडीला केंद्र सरकारचा पाठिंबा-

पोस्ट ऑफिस टीडीचे पोस्ट ऑफिसद्वारे व्यवस्थापन केले जाते. याचे व्याज दर प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला बदलतात. ठेवींचे बँक प्रमाणपत्र चार दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतचे खरेदी करता येते. तसेच एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांचे POTD उपलब्ध आहेत. व्याजदरांची तुलना केल्यास, बँकांच्या मुदत ठेवींच्या तुलनेत पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटचा दर जास्त असल्याचे दिसते. पण बँकांप्रमाणे पोस्टल टाइम ठेवी या जेष्ठ नागरिकांना जास्त कर-बचत व्याज दर देऊ करत नाहीत. तर दुसऱ्या बाजूला पोस्ट ऑफिस टीडीला केंद्र सरकारचा पाठिंबा असल्याने त्या अधिक सुरक्षित आहेत.

Web Title: Bank FD Vs Post Office TD where Should invest money bank or post office good returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.