Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकेत फसवणूक वाढली; रिझर्व्ह बँकेने आकडेवारीच दिली!

बँकेत फसवणूक वाढली; रिझर्व्ह बँकेने आकडेवारीच दिली!

या प्रकरणांमधील रक्कम एका वर्षापूर्वीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:14 AM2022-12-29T10:14:36+5:302022-12-29T10:15:05+5:30

या प्रकरणांमधील रक्कम एका वर्षापूर्वीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे.

bank fraud increased reserve bank of india gave the statistics | बँकेत फसवणूक वाढली; रिझर्व्ह बँकेने आकडेवारीच दिली!

बँकेत फसवणूक वाढली; रिझर्व्ह बँकेने आकडेवारीच दिली!

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने सांगितले की २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे; परंतु, या प्रकरणांमधील रक्कम एका वर्षापूर्वीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे.

आरबीआयने म्हटले की, गेल्या आर्थिक वर्षात ६०,३८९ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ९,१०२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात अशा प्रकरणांची संख्या ७,३५८ होती आणि यामध्ये १.३७ लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली होती.

कर्ज देताना फसवणुकीच्या प्रकरणात घट होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात अशी प्रकरणे १,११२ पर्यंत खाली आली. ज्यात ६,०४२ कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय रोख रकमेची फसवणूकही वाढत आहे. यामध्ये एक लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या प्रकरणांचा समावेश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bank fraud increased reserve bank of india gave the statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.