Join us

देशात आणखी एका बँकेत मोठा घोटाळा उघड! 400 कोटींच्या फ्रॉड प्रकरणी CBI'ने दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 6:30 PM

देशात आणखी एक बँक घोटाळा उघड झाला आहे. सीबीआयने कोलकातामध्ये बेस्ड कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या गुंतवणूकदारांविरोधात 400 कोटींच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

देशात आणखी एक बँक घोटाळा उघड झाला आहे. सीबीआयने कोलकातामध्ये बेस्ड कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या गुंतवणूकदारांविरोधात 400 कोटींच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात कंपनीचे संचाकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 4037.87 कोटी रुपये बँक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 20 बँकांच्या कन्सोर्टियमसोबत बँक फसवणूक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीबीआयने मुंबई, नागपूर, कोलकाता, रांची, दुर्गापूर, विशाखापट्टनम, आणि गाझियाबाद यासह 16 ठिकाणी छापेमारी केली आहे. 

एफआयआरमध्ये अभिजीत ग्रुपचे अध्यक्ष मनोज जयस्वाल, व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अग्रवाल आणि इतरांचा समावेश आहे. 2009 ते 2013 या काळात कथित कर्जदाराने खोटे प्रकल्प खर्च विवरणपत्र सादर करून बँकेचा निधी वळवल्याचाही आरोप आहे. संबंधित व्यवहार आणि निधी डमी खाती असलेल्या अनेक कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे, असे करून कर्जदाराने निधीचा गैरवापर केला असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

सैन्याची बस दरीत कोसळली; 16 जवानांचा मृत्यू, सिक्किममध्ये भीषण अपघात

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत मेहुल चोक्सी-नीरव मोदीसारखा घोटाळा पुन्हा एकदा समोर आला आहे. 34 बनावट बँक गॅरंटीद्वारे 168.59 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी CBI ने PNB अधिकाऱ्याविरुद्ध FIR नोंदवली आहे. या बँक अधिकाऱ्याला आता निलंबित करण्यात आले आहे. मेहुल चोक्सी-नीरव मोदी जोडीच्या कथित लेटर ऑफ क्रेडिट किंवा गॅरंटी घोटाळ्यानंतर सुमारे चार वर्षांनंतर असे हे पहिले प्रकरण आहे.

या एफआयआरनुसार, बँक अधिकारी प्रिया रंजन कुमार यांनी या पद्धतीचा अवलंब करून 34 बनावट बँक गॅरंटी जारी केल्या आणि त्यांना कोअर बँकिंग प्रणाली फिनाकलमध्ये समाविष्ट केले नाही. FIR नुसार, 27 नोव्हेंबर 2022 च्या अंतरिम तपास अहवालानुसार, बँकेच्या प्रणालीमध्ये बेकायदेशीर आणि अनधिकृत प्रवेशाद्वारे काही अज्ञात व्यक्तींच्या संगनमताने बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :व्यवसायबँक