Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holiday: सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्टयांची यादी

Bank Holiday: सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्टयांची यादी

वाचा कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:56 PM2023-08-29T19:56:27+5:302023-08-29T20:08:30+5:30

वाचा कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहणार?

Bank Holiday: Banks will be closed for 16 days in the month of September; Read the list of holidays | Bank Holiday: सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्टयांची यादी

Bank Holiday: सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्टयांची यादी

मुंबई – सप्टेंबर महिन्यात अनेक सण, उत्सव येणार असल्याने बँकेचे व्यवहार बंद राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीप्रमाणे सप्टेंबरमध्ये भारताच्या विविध राज्यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवारसह तब्बल १६ दिवस बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी, विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी, श्रीनारायण गुरू समाधी दिवस, मिलाद ए शेरीफ, ईद ए मिलादसारखे अनेक सण आहेत.

वाचा कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहणार?

६ सप्टेंबर २०२३: श्रीकृष्ण जन्माष्टमी - ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहारमध्ये बँका बंद राहतील.

७ सप्टेंबर २०२३: जन्माष्टमी आणि श्री कृष्ण अष्टमी: गुजरात, मध्य प्रदेश, चंदीगड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

१८ सप्टेंबर २०२३: वारससिद्धी विनायक व्रत आणि विनायक चतुर्थी: कर्नाटक आणि तेलंगणामध्ये बँका बंद राहतील.

१९ सप्टेंबर २०२३: गणेश चतुर्थी – गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि गोव्यात बँका बंद राहतील.

२० सप्टेंबर २०२३: गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) आणि नुआखाई: ओरिसा आणि गोव्यात बँका बंद राहतील.

२२ सप्टेंबर २०२३: श्री नारायण गुरु समाधी दिन: केरळमध्ये बँका बंद राहतील.

२३ सप्टेंबर २०२३: चौथा शनिवार आणि महाराजा हरिसिंह यांचा वाढदिवस: जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

२५ सप्टेंबर २०२३: श्रीमंत शंकरदेव यांची जयंती: आसाममध्ये बँका बंद राहतील.

२७ सप्टेंबर २०२३: मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस): जम्मू आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.

२८ सप्टेंबर २०२३: ईद-ए-मिलाद (पैंगबर मोहम्मद यांचा जन्मदिवस): गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, मणिपूर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि नवी दिल्ली बँका बंद राहील.

२९ सप्टेंबर २०२३: ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा आणि शुक्रवार: सिक्कीम, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

Web Title: Bank Holiday: Banks will be closed for 16 days in the month of September; Read the list of holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक