Join us

Bank Holiday in June 2022: जून महिन्यात ८ दिवस बँक बंद राहतील; ऑनलाईन व्यवहार करता येतील 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 10:46 AM

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, पटना, रांची, चंडीगड, जयपूर, रायपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा याठिकाणी केवळ ६ दिवस बँक बंद राहतील.

नवी दिल्ली - ३ दिवसांनी बुधवारपासून जून महिन्याची सुरुवात होत आहे. यावर्षी जूनमध्ये देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँका ८ दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या या सुट्ट्यांमध्ये ६ विकली ऑफचाही समावेश आहे. तर २ दिवसीय सुट्टी स्थानिक सणांच्या दिवशी देण्यात आल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जूनची सुरुवात झाल्यानंतर २ तारखेला बँक बंद राहतील. त्यामुळे जर तुमचं बँकेत काही महत्त्वाचं काम असेल तर बुधवारी आटपून घ्या. भारतीय रिझर्व्ह बँक देशातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ आणि सुट्टी निश्चित करते. 

कोणत्या दिवशी बँक बंद राहणार?जून २०२२ मध्ये देशातील सर्व बँक ५, १२, १९ आणि २६ जून रोजी रविवार असल्याने बंद राहतील. तर ११ आणि २५ जून रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय २ जून रोजी महाराणा प्रताप जयंतीच्या दिवशी शिमला येथे बँक बंद राहील. तर १५ जून रोजी गुरू हरगोबिंद जयंती, वायएमए दिवस, राजा संक्रांतीनिमित्त मिझोरम, भूवनेश्वर, जम्मू काश्मीरमध्ये बँक बंद राहतील. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, पटना, रांची, चंडीगड, जयपूर, रायपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा याठिकाणी केवळ ६ दिवस बँक बंद राहतील.जूनमध्ये यादिवशी बँक बंद राहणार२ जून - महाराणा प्रताप जयंती(शिमला)५ जून - रविवार११ जून - दुसरा शनिवार१२ जून - रविवार१५ जून - गुरु हरगोबिंद जयंती(मुंबईत बँक सुरू राहील)१९ जून - रविवार२५ जून - चौथा शनिवार२६ जून - रविवारसुट्टीच्या दिवशीही महत्त्वाची कामे पूर्ण होतीलज्या दिवशी बँकांना सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. बँका सर्व ऑनलाईन सेवा पूर्ण महिना सुरू राहतील. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ऑनलाईनद्वारे आर्थिक व्यवहार करू शकाल. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी केवळ शाखा बंद राहतील. एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिटींग मशीन सुरू राहील. त्याशिवाय सुट्टीच्या दिवशी सर्व बँकांचे मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा सक्रीय असतील. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करून तुम्ही बँकांची कामे पूर्ण करू शकाल. 

टॅग्स :बँक