Join us  

Bank Holiday In March : पुढच्या महिन्यात होळीसह हे सण, एवढे दिवस बँका राहणार बंद; आजच पूर्ण करा महत्वाची कामं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:47 AM

मार्च महिन्यात होळी आहे. याशिवाय याच महिन्यात गुढी पाडवा/ उगादी/ पहला नवरात्र/ तेलगू नववर्ष आणि रामनवमीही आहे.

येणाऱ्या मार्च महिन्यात होळीसह अनेक सण उत्सव येत आहेत. अशात, जर आपल्याला बँकांशी संबंधित काही कामे करायची असतील, तर ती पुढील महिन्याची वाट न पाहता याच महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आरबीआयने पुढील महिन्यासाठीची Bank Holiday लिस्ट जारी केली आहे. यानुसार, मार्च महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. RBI च्या वेबसाइटवरही बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट अपडेट करण्यात आली आहे. 

मार्च महिन्यात होळीसह हे सण -मार्च महिन्यात होळी आहे. याशिवाय याच महिन्यात गुढी पाडवा/ उगादी/ पहला नवरात्र/ तेलगू नववर्ष आणि रामनवमीही आहे. खरे तर हे सर्व सण अथवा उत्सव ज्या त्या राज्यांनुसार आहेत आणि यानुसारच, रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या सणांव्यतिरिक्त पुढील मार्च महिन्यात रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारसह एकूण 6 साप्ताहिक सुट्ट्याही आहेत. 

या दिवशी बंद राहतील बँका - तारीख   -    कारण  03 मार्च -     चापचर कूट05 मार्च -    रविवार (साप्ताहिक सुट्टी)07 मार्च -    होळी/ होलिका दहन/ डोल जात्रा08 मार्च -    धुलेटी/ डोल जात्रा/ होळी/ याओसांग (दुसरा दिवस)09 मार्च -    होळी (पाटणा)11 मार्च -    दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)12 मार्च -    रविवार (साप्ताहिक सुट्टी)19 मार्च -    रविवार (साप्ताहिक सुट्टी)22 मार्च -    गुढी पाडवा/ उगादी/ बिहार दिवस/प्रथम नवरात्र/ तेलगू नववर्ष25 मार्च -    चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)26 मार्च -    रविवार (साप्ताहिक सुट्टी)30 मार्च - राम नवमी              बँकांच्या सुट्ट्या (Bank Holiday) विविध राज्यांत साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सवांवर अवलंबून असतात. त्यात्या राज्यांतील उत्सवाच्या दिवशी तेथील बँकांना सुट्टी असते. मात्र, असे असले तरी आपण घर बसल्याही बँकेशी संबंधित काही कामे ऑनलाईन (Online Banking) पद्धतीनेही करू शकता. 

टॅग्स :बँकहॉलिवूड