Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holiday: बँकेची कामे 2 दिवसांत पटापट उरका, लागून आली सलग 4 दिवसांची सुट्टी

Bank Holiday: बँकेची कामे 2 दिवसांत पटापट उरका, लागून आली सलग 4 दिवसांची सुट्टी

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:18 PM2022-04-11T12:18:41+5:302022-04-11T12:20:32+5:30

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे

Bank Holiday: The work of the bank was in full swing, followed by 4 consecutive days off | Bank Holiday: बँकेची कामे 2 दिवसांत पटापट उरका, लागून आली सलग 4 दिवसांची सुट्टी

Bank Holiday: बँकेची कामे 2 दिवसांत पटापट उरका, लागून आली सलग 4 दिवसांची सुट्टी

मुंबई - एप्रिल महिन्यात शाळा आणि कॉलेजच्या परीक्षा संपल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. तर, सरकारी नोकरदारांनाही या महिन्यात सण आणि उत्सावांमुळे अधिकचा आराम मिळणार आहे. कारण, महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सगल 4 दिवसांची सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे, गुरुवारपासून 4 दिवस बँक बंद राहणार आहे. तीन दिवस विविध सण आणि उत्सवांनिमित्त सुट्टी असून चौथी सुट्टी रविवारी आहे. 

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने गुरुवारी 14 एप्रिल रोजी पहिला बँक हॉलिडे असणार आहे. तर, शुक्रवारी 15 एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने त्यादिवशीही सरकारी सुट्टी आहे. यादिवशी जम्मू, श्रीनगर, जयपूर हे शहरं सोडून देशभरात सुट्टी असणार आहे. 16 एप्रिल रोजी शनिवार असून रविवारची हक्काची सुट्टी 17 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे, सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बँकांतून पैसे काढणे किंवा इतर बँकेशी संबंधित कामे करुन घ्यायला हवीत. एटीएम मशिनवरही नागरिकांची रांग दिसून येईल, कदाचित अनेक एटीएम मशिन्समधील कॅशही संपू शकते. 

एप्रिल महिन्यातील पुढील सुट्ट्या

21 एप्रिल: गारिया पूजा (आगरतळा येथे बँक बंद)
23 एप्रिल : महिन्याचा चौथा शनिवार
24 एप्रिल: रविवार
29 एप्रिल: शब ए कादर/जमात उल विदा (जम्मू, श्रीनगरमध्ये बँक बंद)
 

Web Title: Bank Holiday: The work of the bank was in full swing, followed by 4 consecutive days off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.