Join us

Bank Holidays 2018 : 29 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत बँका बंद? हे आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 6:44 AM

कामं या दोन दिवसातच करून घ्या नाहीतर नाहक त्रास होऊ शकतो.

नवी दिल्ली -  मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम काही दिवस उरले असून ज्यांची बँकांची कामे शिल्लक असतील त्यांनी दोन दिवसातच कामे करून घ्यावीत. सध्या सोशम मीडियावर बँका सलग पाच दिवस बंद असल्याचा मॅसेज फिरत आहे. 29 मार्च पासून 2 एप्रिलपर्यंत सर्व बँकाना सुट्टी असल्याचे या मेसेजमधून सांगितले जात आहे. मात्र सलग पाच दिवस बँका बंद नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेया मेसेजमुळं हैराण होण्याची गरज नाही. कारण सलग पाच दिवस बँका बंद राहणार नाहीत. तरीही तुमची बँकाची कामे असतील तर ती या दोन दिवसांत करुन घ्या. 

कारण 29 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत बंका बंद आहेत. शनिवारी  बँका सुरु असतील, तसंच 2 एप्रिल रोजीही काही राज्यांमध्ये बॅंका बंद आहेत. बॅंका बंद असल्यामुळे एटीएममध्येही रोख रकमेची कमतरता जाणवू शकते त्यामुळे कॅशची व्यवस्थाही आधीच करून ठेवा. 31 मार्चला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँकांमध्ये गर्दी जास्त असेल, त्यामुळे कामं या दोन दिवसातच करून घ्या नाहीतर नाहक त्रास होऊ शकतो.

29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे, 31 मार्चला इअर एन्डिंग आणि 1 एप्रिलला रविवार आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक बँकांनी या सलग आलेल्या सुट्यांबाबत आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बॅंकांची कामं अजून झाली नसतील, तर अजिबात वेळ घालवू नका अन्यथा बरेच दिवस वाट पाहावी लागेल.

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशनचे महासचिव राजेंद्र देव यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली. सोशल मीडियावर सलग पाच दिवस बँका बंद असल्याचा मेसेज फिरत आहे. त्याप्रमाणे बँका बंद नाहीत. तो मेजेस चुकाचा आहे. ते म्हणाले की, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच बँका बंद असतात. त्यामुळं पाचव्या शनिवारी बँका बंद असण्याचा काही संबंध नाही. त्यामुळं लोकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेऊ नये. 

मार्च एण्डींगला आर्थिक वर्षाचा लेखाजोखा, मांडताना, सगळे हिशेब जुळवताना बँकांची  पार तारांबळ उडते. बँक कर्मचारी सध्या त्याच कामात व्यग्र आहेत. त्यात यंदा जीएसटीमुळे त्यांच्यावर अधिकच भार पडतोय. व्यापारी, उद्योजकांनी बँकांमध्ये रांगा लावल्यात. कराशी संबंधित कामं त्यांनाही 31 मार्चआधी पूर्ण करायची असल्यानं तेही हातघाईवर आलेत. जीएसटीमुळे फायलिंगही नव्यानं करावं लागत असल्यानं सगळ्यांचाच गोंधळ उडालाय. या पार्श्वभूमीवर, बचत खातेदारांनी आपली कामं शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेतलेली बरी. 

टॅग्स :बँक