एप्रिल महिन्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची लिस्ट आली आहे. मार्च संपण्यासाठी फक्त ९ दिवस बाकी आहेत. आर्थिक वर्षाचे इअर एंड करण्यासाठी शेवटचे काही दिवस बँकांमध्ये एवढी गर्दी असेल की काही विचारू नका, बँक कर्मचाऱ्यांना ३१, ३१ मार्च आणि नंतर १ एप्रिल एवढा ताण असणार आहे की, एप्रिलमधील मिळणाऱ्या सुट्ट्या पाहून तो निघूनही जाणार आहे. परंतू आपल्यासारख्या सामान्यांचे काय? पुढचे नियोजन नाही केले तर, अडचणीत यायला होईल.
एप्रिल महिन्यात गुढी पाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणांमुळे बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने एप्रिलमधील बँक हॉलिडेंची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या देखील आहेत. (Bank Holidays List of April 2022)
या सुट्ट्या देशभरात एकाचवेळी लागू असणार नाहीत. त्या त्या राज्यांनुसार, स्थानिक सणांनुसार या सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. परंतू या राज्यातून त्या राज्यात व्यवहार करणाऱ्यांना, आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात रोजगारासाठी गेलेल्यांना या सुट्ट्या महत्वाच्या आहेत.
ही पहा यादी...
१ एप्रिल - नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आणि क्लोजिंगमुळे सर्व राज्यांतील बँका बंद असतात.
२ एप्रिल - गुढी पाडवा
३ एप्रिल - रविवार
४ एप्रिल - सरिहुल- रांचीमध्ये बँका बंद
५ एप्रिल - बाबू जगजीवन राम जयंती; हैदराबादमध्ये सुटी
९ एप्रिल - दुसरा शनिवार
१० एप्रिल - रविवार
१४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१५ एप्रिल - गुड फ्रायडे
१६ एप्रिल - बोहाग बिहू- गुवाहाटीमध्ये सुटी
१७ एप्रिल - रविवार
२३ एप्रिल - चौथा शनिवार
२४ एप्रिल - रविवार
२९ एप्रिल - शब-ई-कद्र/जुमात-उल-विदा; जम्मू आणि श्रीनगरमध्ये बंद