Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holidays : आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांतील बँका बंद राहणार, तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays : आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांतील बँका बंद राहणार, तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays : आरबीआयच्या कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:51 AM2021-11-03T08:51:38+5:302021-11-03T08:52:52+5:30

Bank Holidays : आरबीआयच्या कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात.

Bank Holidays : banks to remain closed for 5 days from today in these days check details | Bank Holidays : आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांतील बँका बंद राहणार, तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays : आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांतील बँका बंद राहणार, तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली : आजपासून पुढील 5 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  (Reserve Bank of India -RBI) जारी केलेल्या यादीनुसार या सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे तुमचे बँकेचे कोणतेही काम असेल तर ते पुढील आठवड्यासाठी स्थगित करावे लागेल. 

दरम्यान, आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार, यामध्ये काही दिवस असे आहेत, ज्यावेळी काही विशिष्ट भागात सण किंवा जयंती दिनानिमित्त बँका चालू राहणार नाहीत. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. या आरबीआयच्याच्या कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची मोठी यादी आहे.

सुट्ट्यांच्या यादीनुसार कामे उरकून घ्या...
आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामे उरकून घ्या. यादीच्या मदतीने तुम्ही पुन्हा शाखेत जाणे, कामात अडकणे यासारख्या समस्या टाळू शकता. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सवाने होत आहे. यानंतर, 3 नोव्हेंबरला म्हणजेच आज नरक चतुर्दशीला केवळ बंगळुरूमध्ये बँकांमध्ये कोणतेही सामान्य कामकाज होणार नाही. तर 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबरला रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील सुट्ट्या,,,
3 नोव्हेंबर - बुधवार - नरक चतुर्दशीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
4 नोव्हेंबर - गुरुवार - आगरतळा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोची, मुंबई, नागपूर, लखनौ यांसारख्या शहरांमध्ये दिवाळी आणि काली पूजनामुळे बँका बंद राहतील.
५ नोव्हेंबर – शुक्रवार – गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, डेहराडून येथे बँका बंद राहतील.
6 नोव्हेंबर- शनिवार- भाऊबीजची गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
7 नोव्हेंबर - रविवारची सुट्टी.

Read in English

Web Title: Bank Holidays : banks to remain closed for 5 days from today in these days check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.