नवी दिल्ली : जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास तुम्हा बरीच वाट पाहावी लागेल. या महिन्यात जुलैमध्ये एकूण 15 दिवस बंद (Bank holiday list in July 2021) राहील. यामध्ये, येत्या आठवड्यात बहुतेक बँकांच्या सुट्ट्या (Bank Holidays) आहेत. आजपासून म्हणजेच शनिवारीपासून पुढील काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहतील.त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला या सुट्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती असणे आवश्यक आहे.
दुसरा शनिवारी असल्याने 10 जुलै रोजी बँकांमध्ये सुट्टी आहे आणि रविवार असल्याने 11 आणि 18 जुलै रोजी बँका बंद राहतील. याशिवाय, सणांमुळे बँका सोमवार ते पुढच्या शनिवारी एकूण 9 दिवस बंद राहतील. दरम्यान, 15 जुलै रोजी सुट्टी नाही. आरबीआयनुसार, या बँकेच्या सुट्टीचा (upcoming bank holidays list) निर्णय वेगवेगळ्या राज्यांनुसार घेण्यात येतो, त्यानुसार ज्या राज्यांत सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अशाच राज्यात बँका काम करणार नाहीत.
पाहा, सुट्ट्यांची संपूर्ण यादी...1) 10 जुलै 2021 - दुसरा शनिवार2) 11 जुलै 2021 - रविवार3) 12 जुलै 2021 - सोमवार - कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ,)4) 13 जुलै 2021 - मंगळवार - भानु जयंती (शहीद दिवस- जम्मू-काश्मीर, भानु जयंती- सिक्कीम)5) 14 जुलै 2021 - द्रुकपा त्शेची (गंगटोक)6) 16 जुलै 2021 - गुरुवार - हरेला पूजा (देहरादून)7) 17 जुलै 2021 - खारची पूजा (अगरताळा, शिलाँग)8) 18 जुलै 2021 - रविवार9) 19 जुलै 2021 - गुरु रिम्पोछे थुंगकर त्शेचु (Guru Rimpoche's Thungkar Tshechu) (गंगटोक)10) 20 जुलै 2021 - मंगळवार - ईद अल अधा (देशभर)11) 21 जुलै 2021 - बुधवार - बकरी ईद (संपूर्ण देशभर)