Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात तब्बल १२ दिवस बँकांना सुट्टी, तर महाराष्ट्रात एवढे दिवस राहणार बँका बंद 

Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात तब्बल १२ दिवस बँकांना सुट्टी, तर महाराष्ट्रात एवढे दिवस राहणार बँका बंद 

Bank Holidays in September : रिझर्व्ह बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये काही विशिष्ट्य प्रसंगी बँका बंद राहणार आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:36 AM2021-08-28T09:36:36+5:302021-08-28T09:36:52+5:30

Bank Holidays in September : रिझर्व्ह बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये काही विशिष्ट्य प्रसंगी बँका बंद राहणार आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

Bank Holidays: Banks will be closed for 12 days in September, while banks will be closed for so many days in Maharashtra | Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात तब्बल १२ दिवस बँकांना सुट्टी, तर महाराष्ट्रात एवढे दिवस राहणार बँका बंद 

Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात तब्बल १२ दिवस बँकांना सुट्टी, तर महाराष्ट्रात एवढे दिवस राहणार बँका बंद 

नवी दिल्ली - आजकाल बँकांसंबंधीची जवळपास सर्व कामे ही इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून होतात. तरीही काही कामांसाठी आपल्याला बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये धाव घ्यावी लागते. (Banking Sector) अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी कुठल्या तारखेला बँकांन सुट्टी असते, म्हणजेच बँका बंद राहताल, हे जाणून घेणे आवश्यक ठरते. (Bank Holidays in September) रिझर्व्ह बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये काही विशिष्ट्य प्रसंगी बँका बंद राहणार आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे. (Banks will be closed for 12 days in September, while banks will be closed for so many days in Maharashtra)

सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम
रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर दिल्या गेलेल्या सुट्ट्यांसंबंधीच्या यादीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामध्ये शनिवार रविवारी येणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर दिल्या गेलेल्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये काही अशा सुट्ट्याही आहेत. ज्या स्थानिक स्तरावर लागू राहतील. म्हणजेच या सुट्ट्या त्या त्या राज्यात लागू असतील. त्याचं कारण म्हणजे सर्व सण हे एकत्र साजरे केले जात नाहीत. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात १२ दिवस बँकांना सुट्ट्या आहेत पैकी ७ दिवस महाराष्ट्रातील बँकांना सुट्ट्या असतील. त्यामुळे हे सात दिवसा महाराष्ट्रातील बँकांचे कामकाज बंद राहील. 

रिझर्व्ह बँकेने जारी केलेली बँकांच्या सुट्ट्यांची यादी
५ सप्टेंबर - रविवार 
८ सप्टेंबर - श्रीमंत शंकरदेवा तिथी (गुवाहाटी)
९ सप्टेंबर - तीज हरितालिका (गंगटोक)
१० सप्टेंबर - गणेश चतुर्थी, संवत्सरी (चतुर्थी), विनायक चतुर्थी, वरसिद्धी विनायक व्रत (अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर, पणजी)
११ - सप्टेंबर - महिन्यातील दुसरा शनिवार, गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस (पणजी)
१२ - सप्टेंबर - रविवार 
१७ सप्टेंबर - कर्मा पूजा (रांची)
१९ सप्टेंबर रविवार 
२० सप्टेंबर - इंद्रजत्रा (गंगटोक)
२१ सप्टेंबर - श्री नारायण गुरू समाधी दिवस (कोची, तिरुवनंतपुरम)
२५ सप्टेंबर - महिन्यातील चौथा शनिवार 
२६ सप्टेंबर - रविवार 

या सुट्ट्यांच्या यादीनुसार महाराष्ट्रामध्ये ५, १०, ११, १२, १९, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण ७ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. 

Read in English

Web Title: Bank Holidays: Banks will be closed for 12 days in September, while banks will be closed for so many days in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.