Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holidays: 'या' शहरांमध्ये उद्यापासून 5 दिवस बँका राहतील बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

Bank Holidays: 'या' शहरांमध्ये उद्यापासून 5 दिवस बँका राहतील बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

Bank Holidays: भारतीय रिर्झव्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) दिलेल्या अधिसूचनेनुसार, महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी सर्व बँका बंद आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 10:22 AM2021-08-18T10:22:12+5:302021-08-18T10:23:24+5:30

Bank Holidays: भारतीय रिर्झव्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) दिलेल्या अधिसूचनेनुसार, महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी सर्व बँका बंद आहेत.

Bank Holidays: Banks will be closed for 5 days from tomorrow in these cities, complete all banking transactions today | Bank Holidays: 'या' शहरांमध्ये उद्यापासून 5 दिवस बँका राहतील बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

Bank Holidays: 'या' शहरांमध्ये उद्यापासून 5 दिवस बँका राहतील बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

नवी दिल्ली : जर तुम्ही या आठवड्यात बँकेत (Bank News) जाण्याचा विचार केला, तर तुम्हाला तुमच्या शहरातील बँका बंद असतील. त्यामुळे जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही तातडीचे काम असेल तर आजच ते उरकून घ्या.उद्यापासून अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील.

दरम्यान, या आठवड्यात बँकांना गुरुवार पासून म्हणजेच १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट यादरम्यान सलग ५ दिवसांची सुट्टी असेल. मात्र बँकांच्या (Bank Holidays) या सुट्ट्या एकाच वेळी सर्व राज्यांना लागू असणार नाहीत, हे लक्षात असू द्या. प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या दिवशी सुट्टी (Bank holiday in august) घोषित करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये स्थानिक गरजेनुसार सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत.

भारतीय रिर्झव्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) दिलेल्या अधिसूचनेनुसार, महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी सर्व बँका बंद आहेत. हा नियम खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही बँकांमध्ये लागू आहे. 


पुढील ५ दिवस कोणत्या शहरांत बँकांमध्ये कामकाज होणार नाही, हे जाणून घ्या...
1) ऑगस्ट १९ - मोहरम (अशुरा) - अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची आणि श्रीनगर येथे बँका बंद असतील.
2) २० ऑगस्ट - मोहरम/फर्स्ट ओणम - बंगळुरु, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँक बंद असणार आहेत.
3) २१ ऑगस्ट - थिरुवोणम - कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक बंद असतील.
4) २२ ऑगस्ट - रविवार 
5) २३ ऑगस्ट  - श्री नारायण गुरू जयंती - कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँक बंद असणार आहेत.

बँकांच्या आगामी सुट्ट्या
आगामी सुट्ट्यांमध्ये येणारा २८ ऑगस्ट हा महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे बँका बंद राहतील. याशिवाय देशभरातील बँकांना रविवारमुळे २९ ऑगस्ट रोजी सुट्ट्या असणार आहेत. अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगर येथे ३० ऑगस्ट रोजी जन्माष्टमीमुळे बँका बंद राहतील. ३१ ऑगस्टला श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबादमधील बँकाचे कामकाज होणार नाही.

Web Title: Bank Holidays: Banks will be closed for 5 days from tomorrow in these cities, complete all banking transactions today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.