नवी दिल्ली : या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर 2021 (December 2021) संपायला फक्त 8 दिवस उरले आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित अशी अनेक कामे या महिनाअखेरपर्यंत मार्गी लागण्याची गरज आहे. जर तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत बँकेशी संबंधित कामे करायची असतील तर ती सुट्टया पाहून त्वरित आटपून घ्यावी लागतील.
डिसेंबर महिन्यात आजपासून 6 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. मात्र, यातील अनेक सुट्ट्या स्थानिक आहेत. याचबरोबर, वर्ष संपायला फक्त 8 दिवस उरले आहेत, त्यामुळे तुम्हाला बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट पाहावी लागणार आहे. डिसेंबर महिन्यात एकूण 16 दिवस बँकांना सुट्ट्या (Bank Holidays November) आहेत. ज्यामध्ये 4 सुट्ट्या रविवारी असतील. यातील अनेक सुट्ट्याही लागोपाठ असणार आहेत. डिसेंबर महिन्यात ख्रिसमस फेस्टिव्हल येतो, या फेस्टिव्हलची सुट्टी देशातील जवळपास सर्व बँकांना असते.
दरम्यान, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. येथे आरबीआयच्या डिसेंबर महिन्याच्या यादीसोबत हे देखील सांगण्यात येत आहे की, कोणत्या दिवशी बँका कोणत्या राज्यात बंद राहतील आणि कुठे उघड्या राहतील. या आधारावर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा ताबडतोब करावा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.
डिसेंबर 2021 महिन्यातील बँक सुट्ट्या..3 डिसेंबर – फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर (Kanakadasa Jayanthi/Feast of St. Francis Xavier) (पणजीत बँका बंद)5 डिसेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)11 डिसेंबर - शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)12 डिसेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)18 डिसेंबर - यू सो सो थामची पुण्यतिथी (शिलाँगमध्ये बँका बंद)19 डिसेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)24 डिसेंबर - ख्रिसमस फेस्टिव्हल (आयझॉलमध्ये बँका बंद)25 डिसेंबर - ख्रिसमस (बंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद) शनिवार, (महिन्याचा चौथा शनिवार)26 डिसेंबर - रविवार (साप्ताहिक सुट्टी)27 डिसेंबर - ख्रिसमस सेलिब्रेशन (आयझॉलमध्ये बँका बंद)30 डिसेंबर - यू कियांग नोंगबाह (शिलॉन्गमध्ये बँका बंद)31 डिसेंबर – नवीन वर्षांची संध्याकाळ (आयझॉलमध्ये बँका बंद)