Join us

Bank Holidays List: मोठमोठे सणवार ऑगस्ट महिन्यातच आले; महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद असणार, पहा बँक ह़ॉलिडे लिस्ट  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 1:50 PM

Bank Holidays in August 2022: गणपती, स्वातंत्र्य दिन, मोहरम, रक्षाबंधन, जन्माष्टमी... महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद असणार... जाणून घ्या सुट्ट्यांची लिस्ट

ऑगस्टचा महिना आपल्यासाठी विविध गोष्टींसाठी खास आहे. भारत सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. तसेच ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो तो गणेशोत्सव देखील या महिन्यात येत आहे. यामुळे या महिन्यात सुट्ट्यांची रेलचेल असणार आहे. ऑगस्ट महिन्यासाठी आरबीआयने बँक हॉलिडेंची लिस्ट जारी केली आहे. 

पुढील महिन्यात दुसरा आणि चौथ्या शनिवार धरून तेरा दिवस बँका बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थीसारखे मोठे सण याच महिन्यात येत आहेत. यामुळे बँकांशी संबंधीत काही काम असेल तर ते नियोजन करून उरकावे. 

ही आहे सुट्ट्यांची यादी...

  • 1 ऑगस्ट: द्रुपका शे-जी उत्सव (फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.)
  • 7 ऑगस्ट: 2022 - पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 8 ऑगस्ट: मोहरम (फक्त जम्मू आणि काश्मीरमधील बँका बंद राहतील)
  • ९ ऑगस्ट: मोहरम (अगरतळा, अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद राहतील.)
  • 11 ऑगस्ट: रक्षा बंधन (देशभरात सुट्टी)
  • 13 ऑगस्ट: दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 14 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • १५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
  • 16 ऑगस्ट: पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
  • 18 ऑगस्ट: जन्माष्टमी (देशभर सुट्टी)
  • 21 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 28 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 31 ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)

 

या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. RBI (Bank Holidays List 2022) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगांवर आहेत. काही ठिकाणी सण साजरे करण्याचे दिवस बदलतात. यानुसार हे बदल असतात.  

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँक