Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिसेंबर महिन्यात बँकांमध्ये काम आहे? १८ दिवस सुट्टी असणार; राज्यांनुसार संपूर्ण यादी तपासा

डिसेंबर महिन्यात बँकांमध्ये काम आहे? १८ दिवस सुट्टी असणार; राज्यांनुसार संपूर्ण यादी तपासा

डिसेंबर २०२३ मध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. तुम्हालाही या महिन्यात काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर येथे दिलेली बँक हॉलिडे लिस्ट तपासा.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 03:02 PM2023-11-29T15:02:12+5:302023-11-29T15:06:15+5:30

डिसेंबर २०२३ मध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. तुम्हालाही या महिन्यात काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर येथे दिलेली बँक हॉलिडे लिस्ट तपासा.

bank holidays in december 2023 banks to remain closed for 18 days check state wise holiday list | डिसेंबर महिन्यात बँकांमध्ये काम आहे? १८ दिवस सुट्टी असणार; राज्यांनुसार संपूर्ण यादी तपासा

डिसेंबर महिन्यात बँकांमध्ये काम आहे? १८ दिवस सुट्टी असणार; राज्यांनुसार संपूर्ण यादी तपासा

२०२३ वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना काही दिवसातच सुरू होणार आहे. या महिन्यातही बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असणार आहेत. जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर आधी  सुट्ट्यांची यादी तपासा. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. जर बँकांना जास्त सुट्ट्या असतील तर अनेकांनी महत्वाची कामे अडकली जातात. 

डिसेंबरमध्ये बँकांना १८ दिवस सुट्टी असेल. डिसेंबरमध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या असतात. या महिन्यात शनिवार आणि रविवारसह विविध राज्यांमध्ये १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये राज्यांनुसार सण आणि वर्धापनदिनाच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. डिसेंबरमध्ये विविध राज्यांचा स्थापना दिन, ख्रिसमस इत्यादी कारणांमुळे काही राज्यांमध्ये बँका सलग अनेक दिवस बंद राहणार आहेत. 

डिसेंबरमध्ये या दिवशी बँका बंद राहणार

१ डिसेंबर २०२३- राज्य स्थापना दिनानिमित्त इटानगर आणि कोहिमा बँकांना सुट्टी असेल.

३ डिसेंबर २०२३- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

४ डिसेंबर २०२३- सेंट फ्रान्सिस झेवियरच्या सणानिमित्त बँका पणजी, गोव्यात असतील.

९ डिसेंबर २०२३- दुसऱ्या शनिवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.

१० डिसेंबर २०२३- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

१२ डिसेंबर २०२३- लोसुंग/पा टोगान नेंगमिंजा संगमा शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.

१३ डिसेंबर २०२३- लोसुंग/पा टोगानमुळे गंगटोकमधील बँकांना सुट्टी असेल.

१४ डिसेंबर २०२३- लोसुंग/पा टोगानमुळे गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.

१७ डिसेंबर २०२३- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत.

१८ डिसेंबर २०२३- यू सो थामच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमधील बँकांना सुट्टी असेल.

१९ डिसेंबर २०२३- गोवा मुक्ती दिनानिमित्त पणजीत बँका बंद राहतील.

२३ डिसेंबर २०२३- चौथ्या शनिवारी देशभरात बँका बंद राहणार आहेत.

२४ डिसेंबर २०२३- रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल.

२५ डिसेंबर २०२३- ख्रिसमसनिमित्त देशभरात बँका बंद राहतील.

२६ डिसेंबर २०२३- ख्रिसमसच्या सणानिमित्त आयझॉल, कोहिमा, शिलाँग येथे बँका बंद राहतील.

२७ डिसेंबर २०२३- ख्रिसमसमुळे कोहिमामधील बँका बंद राहतील.

३० डिसेंबर २०२३- शिलॉन्गमधील बँकांना यु कियांगमुळे सुट्टी असेल.

३१ डिसेंबर २०२३- रविवारमुळे संपूर्ण देशात सुट्टी असेल.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे बँकिंग व्यवस्थेत अनेक बदल झाले आहेत. सध्या बँक बंद राहिल्यानंतरही ग्राहकांना फारसा त्रास सहन करावा लागत नाही. बँक बंद झाल्यास, तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी UPI, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग इत्यादी वापरू शकता. पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जाऊ शकतो.

Web Title: bank holidays in december 2023 banks to remain closed for 18 days check state wise holiday list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक