नवी दिल्ली : जर तुम्ही येत्या जून महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुढील महिना म्हणजे जून 2022 च्या बँकेच्या सुट्ट्यांची (Bank Holidays in January 2022) लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टनुसार जून महिन्यात 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही पुढील महिन्यातील कामांसाठी बँकेच्या शाखेत जाण्याआधी बँक सुट्ट्यांची लिस्ट (Bank Holidays List) नक्की पाहा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची लिस्ट 3 कॅटगरीत विभागली आहे. यामध्ये पहिली- हॉलिडेज अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट (Holiday under Negotiable Instruments Act), दुसरी- हॉलिडेज अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे (Holiday under Negotiable Instruments Act and Real Time Gross Settlement Holiday) आणि तिसरी- बँक के अकाउंट्स क्लोजिंग (Banks’ Closing of Accounts) कॅटगरी आहे.
दरम्यान, बँकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. जून महिन्यात येणार्या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात. त्यामुळे, बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. तसेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे बँक सुट्ट्यांची लिस्ट पाहून तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा ताबडतोब करावा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
जून 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी...2 जून (गुरुवार): महाराणा प्रताप जयंती/तेलंगणा स्थापना दिवस - हिमाचल प्रदेश, हरयाणा, राजस्थान, तेलंगणा3 जून (शुक्रवार): श्री गुरु अर्जुन देव जी यांचा हुतात्मा दिवस - पंजाब5 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी11 जून (शनिवार): दुसरा शनिवार बँक सुट्टी12 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी14 जून (मंगळवार): पहिला राजा/संत गुरू कबीर जयंती - ओरिसा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, पंजाब15 जून (बुधवार): राजा संक्रांती/वायएमए दिवस/गुरु हरगोविंद यांचा जन्मदिवस - ओरिसा, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर19 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी22 जून (बुधवार): खारची पूजा - त्रिपुरा25 जून (शनिवार): चौथा शनिवार बँक सुट्टी26 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी30 जून (बुधवार): रामना नी - मिझोरम