Join us

Bank Holidays : जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहणार बँका; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 4:49 PM

Bank holidays January 2022 : जानेवारी 2022 मध्ये बँका जवळपास 14 दिवस बंद राहणार आहेत. जानेवारी 2022 मध्ये बँकांना असणाऱ्या एकूण 14 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये (Bank Holidays in January) 4 सुट्ट्या रविवारी आहेत.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुढच्या वर्षीचा पहिला महिना म्हणजे जानेवारी 2022 च्या बँकेच्या सुट्ट्यांची (Bank Holidays in January 2022) लिस्ट जाहीर केली आहे. त्यामुळे तुम्ही पुढील महिन्यातील कामांसाठी बँकेच्या शाखेत जाण्याआधी बँक सुट्ट्यांची लिस्ट (Bank Holidays List) नक्की पाहा. 

या लिस्टनुसार जानेवारी 2022 मध्ये बँका जवळपास 14 दिवस बंद राहणार आहेत. जानेवारी 2022 मध्ये बँकांना असणाऱ्या एकूण 14 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये (Bank Holidays in January) 4 सुट्ट्या रविवारी आहेत. यामध्ये अनेक सुट्टया जोडूनही येत आहेत. दरम्यान, संपूर्ण देशातील बँका 14 बंद राहणार नाहीत. यातील अनेक सुट्ट्या स्थानिक आहेत. 

आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार (Bank Holidays List) या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होत नाहीत. ज्या राज्यात जो सण किंवा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तिथे ती सुट्टी लागू होते. 

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. तसेच, आरबीआयच्या जानेवारी महिन्याच्या लिस्ट सोबत हे देखील सांगण्यात येत आहे की, कोणत्या दिवशी बँका कोणत्या राज्यात बंद राहतील आणि कुठे उघड्या राहतील. या आधारावर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा ताबडतोब करावा जेणेकरून तुमची गैरसोय होऊ नये.

जानेवारी 2022 मधील बँक सुट्ट्या...1 जानेवारी -  शनिवार (देशभर) नववर्षाचा दिवस2 जानेवारी - रविवार (देशभर) साप्ताहिक सुट्टी3 जानेवारी - सोमवार सिक्कीममधील नववर्ष आणि लासूंगची सुट्टी4 जानेवारी - मंगळवार सिक्कीममध्ये लासूंग सणाची सुट्टी असेल9 जानेवारी - रविवार (देशभर) गुरुगोविंदसिंग जयंती सुट्टी, साप्ताहिक सुट्टी11 जानेवारी - मंगळवार मिशनरी दिवस मिझोराम12 जानेवारी - बुधवार स्‍वामी विवेकानंद जयंती सुट्टी14 जानेवारी - शुक्रवार अनेक राज्यांतील मकर संक्रांत सुट्टी15 जानेवारी - शनिवार पोंगल आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडूत सुट्टी16 जानेवारी - रविवार (देशभर) साप्ताहिक सुट्टी23 जानेवारी - रविवार नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती25 जानेवारी - मंगळवार राज्य स्थापना दिवस हिमाचल प्रदेश26 जानेवारी - बुधवार (देशभर) प्रजासत्ताक दिन31 जानेवारी - सोमवार आसाममध्ये

टॅग्स :बँकव्यवसाय