नवी दिल्ली - बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण जुलै महिन्यात (July 2021) तब्बल 15 दिवस बँकेचे (Bank) कामकाज बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) दर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर (Bank holidays list) केली जाते. प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.
दर महिन्याला साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त इतरही काही सुट्ट्या (Bank holidays) बँक कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगळ्या असतात. जुलै 2021 मध्ये सणसमारंभानिमित्त 9 सुट्ट्यात आहेत. तर या व्यतिरिक्त 6 सुट्ट्या या साप्ताहिक सुट्ट्या म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या आहेत. अशाप्रकारे एकूण 15 सुट्ट्या पुढील महिन्यात असणार आहेत. बँका कधी नेमक्या बंद असणार हे जाणून घेऊया...
जुलैमध्ये 'या' दिवशी बँका राहणार बंद (Bank holiday list in July 2021)
- 4 जुलै 2021 - रविवार
- 10 जुलै 2021 - दुसरा शनिवार
- 11 जुलै 2021 - रविवार
- 12 जुलै 2021 - सोमवार - कांग (राजस्थान), रथ यात्रा (भुवनेश्वर, इम्फाळ)
- 13 जुलै 2021 - मंगळवार - भानू जयंती (शहीद दिवस- जम्मू आणि कश्मीर, भानू जयंती–सिक्किम)
- 14 जुलै 2021 - द्रुकपा त्शेची (गंगटोक)
- 16 जुलै 2021- गुरुवार - हरेला पूजा (देहरादून)
- 17 जुलै 2021 - खारची पूजा (आगरतळा, शिलाँग)
- 18 जुलै 2021 - रविवार
- 19 जुलै 2021 - गुरु रिम्पोछे के थुंगकर त्शेचु (गंगटोक)
- 20 जुलै 2021 - मंगळवार - ईद अल अधा (देशभर सुट्टी)
- 21 जुलै 2021 - बुधवार - बकरी ईद (देशभर सुट्टी)
- 24 जुलै 2021 - चौथा शनिवार
- 25 जुलै 2021 - रविवार
- 31 जुलै 2021- शनिवार - केर पूजा (आगरतळा)
सर्व सुट्ट्यांची यादी तपासण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx भेट देऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.