Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holiday's in June: जूनमध्ये 9 दिवस बँका बंद राहणार; जाणून घ्या कधी कधी आहे हॉलिडे

Bank Holiday's in June: जूनमध्ये 9 दिवस बँका बंद राहणार; जाणून घ्या कधी कधी आहे हॉलिडे

Bank Closed in June 2021, Holiday list: काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. बँकांची कामाची वेळ बदलली असेल किंवा कमी कर्मचाऱ्यांमुळे काम धीमे झाले असेल. यामुळे पहिले दोन आठवडे कामासाठी पुरेसा वेळ देणारे आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 03:53 PM2021-06-01T15:53:39+5:302021-06-01T15:54:52+5:30

Bank Closed in June 2021, Holiday list: काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. बँकांची कामाची वेळ बदलली असेल किंवा कमी कर्मचाऱ्यांमुळे काम धीमे झाले असेल. यामुळे पहिले दोन आठवडे कामासाठी पुरेसा वेळ देणारे आहेत. 

Bank Holiday's in June 2021: Banks will be closed for 9 days in June; Find out full list | Bank Holiday's in June: जूनमध्ये 9 दिवस बँका बंद राहणार; जाणून घ्या कधी कधी आहे हॉलिडे

Bank Holiday's in June: जूनमध्ये 9 दिवस बँका बंद राहणार; जाणून घ्या कधी कधी आहे हॉलिडे

Bank Holidays in June 2021: मंगळवारपासून जून महिना सुरु झाला आहे. या पहिल्या आठवड्यात केवळ 6 जूनलाच बँका बंद (Bank Holidays) असणार आहेत. या दिवशी रविवार आहे. बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शनिवारची जोडून सुटी असते. जून महिना तसा दिलासा देणारा आहे. (Bank holidays in June 2021 include the second and fourth Saturdays as well as four Sundays)


यानंतर थेट 12 जूनला दुसरा शनिवार येत आहे, यामुळे या दिवशी बँकांचे कामकाज बंद असणार आहे. 13 जूनला रविवारी असल्याने बँक बंद असेल. यामुळे तुम्हाला पुढील 13 दिवसांत 10 दिवस बँका सुरु असल्याने कामे उरकता येणार आहेत. काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. बँकांची कामाची वेळ बदलली असेल किंवा कमी कर्मचाऱ्यांमुळे काम धीमे झाले असेल. यामुळे पहिले दोन आठवडे कामासाठी पुरेसा वेळ देणारे आहेत. (Banks would remain closed for up to nine days in June 2021, according to the Reserve Bank of India (RBI) holiday calendar list.)


यानंतर पुढचा तिसरा आठवडा देखील ग्राहकांना दिलासा देणारा आहे. 12, 13 जूननंतर थेट रविवारीच सात दिवसांनी म्हणजेच 20 जूनला सुटी असणार आहे. मात्र, ओडिशा, मिझोराममध्ये 15 जूनला सुट्टी असणार आहे. मिझोराममध्ये Y.M.A. Day आणि ओडिशामध्ये राजा संक्रांती साजरी केली जाणार आहे. 


मिझोराममध्ये Youth Mizo Association (Y.M.A.) चा स्थापना दिवस असतो. Y.M.A. ची स्थापना 1935 मध्ये झाली होती. ही मिझोरामची सर्वात मोठी स्वयंसेवक संघटना आहे. तर ओडिशामध्ये राजा संकांती म्हणजेच मिथुन संक्रांतीचा उत्सव महिलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. हा उत्सव तीन दिवस चालतो. 


केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये 25 जूनला बँका बंद असणार आहेत. शीख समाजाचे सहावे गुरु, गुरु हरगोविंद सिंग यांची जयंती साजरी केली जाते. 26 आणि 27 जूनला दोन दिवसांची आठवडी सुटी असणार आहे. शनिवार आणि रविवार आहे. तर मिझोरामला 30 जूनला बँका बंद असतील. या दिवशी ‘रेमना नी’ साजरा केला जातो. 
 

Read in English

Web Title: Bank Holiday's in June 2021: Banks will be closed for 9 days in June; Find out full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.