Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holidays List : एप्रिलमध्ये या दिवशी बँका असणार बंद; उन्हा तान्हात लिस्ट पाहून कामासाठी निघा...

Bank Holidays List : एप्रिलमध्ये या दिवशी बँका असणार बंद; उन्हा तान्हात लिस्ट पाहून कामासाठी निघा...

Bank Holidays List April 2022: गेले दोन दिवस बँक कर्मचारी संपावर आहेत. त्या आधी शनिवार आणि रविवारची सुट्टी होती. उद्यापासून मार्च एंडची कामे असतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:38 AM2022-03-29T08:38:59+5:302022-03-29T08:40:21+5:30

Bank Holidays List April 2022: गेले दोन दिवस बँक कर्मचारी संपावर आहेत. त्या आधी शनिवार आणि रविवारची सुट्टी होती. उद्यापासून मार्च एंडची कामे असतील

Bank Holidays List : Banks will be closed on this day's in April 2022; two times 3-4 days holiday | Bank Holidays List : एप्रिलमध्ये या दिवशी बँका असणार बंद; उन्हा तान्हात लिस्ट पाहून कामासाठी निघा...

Bank Holidays List : एप्रिलमध्ये या दिवशी बँका असणार बंद; उन्हा तान्हात लिस्ट पाहून कामासाठी निघा...

एप्रिल महिन्यात सार्वजनिक सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. यामध्ये पाडवा, आंबेडकर जयंती, गुड फ्रायडेसारख्या सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे बँका सलग तीन तीन चार चार दिवस बंद असणार आहेत. यामुळे उन्हा तान्हाचे सुट्ट्यांची यादी पाहूनच बाहेर पडलेले बरे, नाहीतर कामाचा खोळंबा होईलच सोबत हेलपाटे देखील घालावे लागणार आहेत. 

गेले दोन दिवस बँक कर्मचारी संपावर आहेत. त्या आधी शनिवार आणि रविवारची सुट्टी होती. उद्यापासून मार्च एंडची कामे असतील, त्यामुळे २ एप्रिलपर्यंत तुमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. एप्रिल महिन्यात गुढी पाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणांमुळे तसेच साप्ताहिक सुट्टीमुळे बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने एप्रिलमधील बँक हॉलिडेंची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या देखील आहेत. (Bank Holidays List of April 2022)

या सुट्ट्या देशभरात एकाचवेळी लागू असणार नाहीत. त्या त्या राज्यांनुसार, स्थानिक सणांनुसार या सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. परंतू या राज्यातून त्या राज्यात व्यवहार करणाऱ्यांना, आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात रोजगारासाठी गेलेल्यांना या सुट्ट्या महत्वाच्या आहेत. 

ही पहा यादी...
१ एप्रिल - नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आणि क्लोजिंगमुळे सर्व राज्यांतील बँका बंद असतात.
२ एप्रिल - गुढी पाडवा
३ एप्रिल - रविवार 
४ एप्रिल - सरिहुल- रांचीमध्ये बँका बंद
५ एप्रिल - बाबू जगजीवन राम जयंती; हैदराबादमध्ये सुटी
९ एप्रिल - दुसरा शनिवार
१० एप्रिल - रविवार 
१४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 
१५ एप्रिल - गुड फ्रायडे
१६ एप्रिल - बोहाग बिहू- गुवाहाटीमध्ये सुटी
१७ एप्रिल - रविवार
२३ एप्रिल - चौथा शनिवार
२४ एप्रिल - रविवार 
२९ एप्रिल - शब-ई-कद्र/जुमात-उल-विदा; जम्मू आणि श्रीनगरमध्ये बंद


 

Web Title: Bank Holidays List : Banks will be closed on this day's in April 2022; two times 3-4 days holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.