नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of Corona)देशभर हाहाकार माजला आहे. दररोज 4 लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थिती सध्या अनेक बँकांकडून आपल्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामे इंटरनेटच्या (Internet Banking) माध्यामातून करण्यास सांगितले जात आहे. बँकांकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेट बँकिंग आणि इतर ऑनलाइन सुविधांमध्ये (Online Banking)देखील वाढ झाली आहे.
दरम्यान, असे असले तरी तुम्हाला बँकसंबंधी अत्यावश्यक काम करायचे असले आणि त्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत (Bank Branch)जाणे गरजेचे असेल, तर आधी बँका कधी बंद (Bank Holidays)आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोना लॉकडाऊन काळात होणारा खोळंबा टाळता येईल. प्रत्येक महिन्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे देण्यात आलेल्या सुट्टीनुसार मे महिन्यात काही दिवस बँका बंद राहणार आहेत. (bank holidays in may 2021 banks to remain closed for 8 days ahead check important list)
सर्व राज्यांसाठी सुट्ट्यांबाबत वेग-वेगळे नियमआरबीआयच्या वेबसाइटनुसार (Bank Holidays List May 2021) मे मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये आठवड्याच्या सुट्ट्या देखील समाविष्ट आहेत. यापैकी काही सुट्ट्या झाल्या आहेत, तर अद्यापही आठ सुट्ट्या बाकी आहेत. अर्थात उर्वरित महिन्यात आणखी आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या वेबसाइटनुसार काही सुट्ट्या काही ठराविक राज्यात असतात, इतर राज्यांवर त्याचा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ जर एखादा राज्यात ठराविक सण साजरा केला जातो, तर त्याची सुट्टी इतर राज्यांमध्ये दिली जाणार नाही.
बँक सुट्ट्यांची लिस्ट (Bank Holidays) :
>> 9 मे : रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
>> 13 मे : रमजान ईद (ईद-उल-फितर). यादिवशी बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद असतील
>>14 मे : भगवान श्री परशुराम जयंती / रमजान ईद (ईद-उल-फितर) / बसवा जयंती / अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2021) यादिवशी बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद असतील
>> 16 मे : रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
>> 22 मे : चौथा शनिवार (सर्व राज्यात सुट्टी)
>> 23 मे : रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
>> 26 मे : बौद्ध पौर्णिमा. या दिवशी आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर इ. ठिकाणी बँका बंद राहतील.
>> 30 मे : रविवार (सर्व राज्यात सुट्टी)