Join us

Bank Holidays In November: सणासुदीचा महिना! नोव्हेंबरमध्ये तब्बल १७ दिवस बँका असणार बंद, झटपट उरकून घ्या व्यवहार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 3:23 PM

Bank holidays in November: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सणासुदीचा असतो. यात लागोपाठ सुट्ट्या असतात आणि बँक व्यवहारांवर याचा परिणाम होतो.

Bank holidays in November: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सणासुदीचा असतो. यात लागोपाठ सुट्ट्या असतात आणि बँक व्यवहारांवर याचा परिणाम होतो. ऑक्टोबरमध्येही बरेच दिवस बँका बंद होत्या. आता नोव्हेंबरमध्येही भरभरुन सुट्ट्या असणार आहेत. देशातील विविध भागांमध्ये एकूण मिळून नोव्हेंबर महिन्यात तब्बल १७ दिवस बँक हॉलीडे असणार आहे. त्यामुळे बँके संदर्भात तुमचे काही आर्थिक व्यवहार असतील तर ते झटपट उरकून घ्या. 

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, छठ पूजासारखे महत्त्वाचे सण असणार आहेत. यासोबतच सण, जयंती हे सर्व मिळून विविध भागांमध्ये ११ दिवस सुट्ट्या असणार आहेत. याशिवाय चार रविवार आणि दोन शनिवार असं पकडून एकून १७ दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. 

रिझर्व्ह बँकेनं नोव्हेंबर महिन्यातील जारी केलेले बँक हॉलीडे पुढीलप्रमाणे-१ नोव्हेंबर- कन्नड राज्योत्सव (बंगलोर, इम्फाळ विभाग)३ नोव्हेंबर- नरक चतुदर्शी (बंगलोर विभाग)४ नोव्हेंबर- दिपावली, लक्ष्मीपूजन५ नोव्हेंबर- बलिप्रतिपदा, विक्रम संवत नव वर्ष, गोवर्धन पूजा (देशातील काही शहरांमध्ये सुट्टी)६ नोव्हेंबर- भाऊबीज, चित्रगुप्त जयंती (देशातील काही शहरांमध्ये सुट्टी)७ नोव्हेंबर- रविवार१० नोव्हेंबर- छठ पूजा (बिहार-झारखंड विभाग)११ नोव्हेंबर- छढ पूजा (बिहार विभाग)१२ नोव्हेंबर- वंगला फेस्टिव्हल (शिलाँग विभाग)१३ नोव्हेंबर- दुसरा शनिवार१४ नोव्हेंबर- रविवार१९ नोव्हेंबर- गुरुनानक जयंती, कार्तिक पौर्णिमा (देशातील काही शहरांमध्ये सुट्टी)२१ नोव्हेंबर- रविवार२२ नोव्हेंबर- कनकदास जयंती (बंगलोर विभाग)२३ नोव्हेंबर- सेंग कुत्सनेम (शिलाँग विभाग)२७ नोव्हेंबर- चौथा शनिवार२८ नोव्हेंबर- रविवार

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र