नवी दिल्ली - बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 4 दिवस बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहणार आहे. आरबीआय स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी सध्या फक्त 10 दिवस शिल्लक आहेत.
पुढच्या10 दिवसांतही बँकेचे काम 4 दिवस बंद असणार आहे. कारण बँकांमध्ये सुमारे 4 दिवस सुट्टी असणार आहे. 20 सप्टेंबर म्हणजे आज काही ठिकाणी सुट्टी आहे. गंगटोकमधील इंद्रराज यात्रेनिमित्त सोमवारी बँका बंद राहतील. तर श्रीनारायण गुरू समाधी दिनामुळे तिरुअनंतपुरम आणि कोची येथील बँका 21 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी बंद राहणार आहेत. मात्र, उत्तर भारतात सोमवार आणि मंगळवारी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. तसेच शनिवार आणि रविवार निमित्तही सुट्टी असणार आहे.
25 आणि 26 सप्टेंबरला सुट्टी
25 आणि 26 सप्टेंबरला बँकांमध्ये सुट्टी असेल. 25 सप्टेंबर हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने सुट्टी आहे, तर 26 सप्टेंबर रविवार असल्यामुळे सुट्टी आहे. बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सणासुदीचा काळ असल्याने ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. कारण ऑनलाईन बँकिंग, डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग द्वारे तुम्ही तुमचे महत्वाचे काम आणि व्यवहार झटपट करू शकता. तुम्हाला बँकेच्या App, ऑनलाईन बँकिंगमधून बँकिंगशी संबंधित कामांची सुविधा मिळते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.