मुंबई : सायबरचोरी झाल्यास तो पैसा परत मिळविण्यावर आता बँकांनी जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने विविध देशांशी शिष्टाचारांतर्गत समन्वय साधण्यात आला आहे. त्यानुसार पैसा त्वरीत कसा मिळवता येईल, यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित झाली आहे, अशी माहिती बँक आॅफ इंडियाचे सीईओ दिनबंधू मोहपात्रा यांनी दिली.
दक्षता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोहपात्रा यांनी ‘सायबरचोरी’ संबंधी सांगितले की, सायबर चोरी होते त्यावेळी बँकेचा वा वैयक्तिक खातेदारांचा पैसा अन्यत्र वळवला जातो. पण हा पैसा तात्काळ चोरी करणाऱ्याच्या खात्यात जात नाही. त्याआधी तो १० ते १२ खात्यांमधून फिरतो. त्याच्या हाती पोहोचेपर्यंत बराच अवधी असतो. त्यामुळे चोरी झाल्याचे तात्काळ ध्यानात आल्यास हा पैसा पुन्हा मिळवणे शक्य असते.
सायबरचोरी रोखण्यासाठी बँक आॅफ इंडियाचा विविध देशांशी समन्वय
सायबरचोरी झाल्यास तो पैसा परत मिळविण्यावर आता बँकांनी जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने विविध देशांशी शिष्टाचारांतर्गत समन्वय साधण्यात आला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:30 AM2018-11-03T04:30:18+5:302018-11-03T04:30:41+5:30