Lokmat Money > बिझनेस न्यूज > BOI च्या ग्राहकांना अलर्ट! 21 एप्रिलपासून बंद होणार 'ही' सेवा, वाचा बँकेनं काय म्हटलंय?

BOI च्या ग्राहकांना अलर्ट! 21 एप्रिलपासून बंद होणार 'ही' सेवा, वाचा बँकेनं काय म्हटलंय?

Bank of India customer's Alert : कार्ड शिल्डद्वारे ग्राहक आपल्या कार्डवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहेत. यामुळे ग्राहकांना डेबिट कार्ड कधी, कुठे, कसे आणि किती वापरावे हे समजते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 02:15 PM2021-03-20T14:15:46+5:302021-03-20T14:30:44+5:30

Bank of India customer's Alert : कार्ड शिल्डद्वारे ग्राहक आपल्या कार्डवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहेत. यामुळे ग्राहकांना डेबिट कार्ड कधी, कुठे, कसे आणि किती वापरावे हे समजते.

bank of india customers alert notice for termination of card shield application for debit card details here | BOI च्या ग्राहकांना अलर्ट! 21 एप्रिलपासून बंद होणार 'ही' सेवा, वाचा बँकेनं काय म्हटलंय?

BOI च्या ग्राहकांना अलर्ट! 21 एप्रिलपासून बंद होणार 'ही' सेवा, वाचा बँकेनं काय म्हटलंय?

Highlightsबँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही बँक ऑफ इंडियाचे (Bank of India) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना 21 एप्रिल 2021 च्या आधी Card Shield Application अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. जर ग्राहकांनी अपडेट केले नाही तर 22 एप्रिलपासून कार्ड चालणार नाही. बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. (bank of india customers alert notice for termination of card shield application for debit card details here)

बँकेने काय म्हटले आहे?
बँकेच्या म्हणण्यानुसार, बँकेच्या ग्राहकांना डेबिट कार्डवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची सुविधा मिळते. बँकेने आता ही सेवा BOI मोबाइल अॅप आणि इंटरनेट बँकिंगसोबत इंटिग्रेट केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता बँकेचे मोबाइल अ‍ॅप वापरावे.
बँक ऑफ इंडियाने ट्विट केले की, डेबिट कार्डसाठी कार्ड शिल्ड (Card Shield) अर्ज संपुष्टात आणण्यासाठी सूचना! BOI मोबाइल बँकिंग अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक:
प्लेस्टोअर : http://bit.ly/BO
Appstore : http://bit.ly/BOIMB

(LIC चा मोठा निर्णय! आता देशातील कोणत्याही ब्रांचमध्ये जमा करू शकता मॅच्युरिटी डॉक्युमेंट्स)

जाणून घ्या, बँकेच्या कार्ड शिल्डचा फायदा...
कार्ड शिल्डद्वारे ग्राहक आपल्या कार्डवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहेत. यामुळे ग्राहकांना डेबिट कार्ड कधी, कुठे, कसे आणि किती वापरावे हे समजते. जर एखाद्या ग्राहकाचे कार्ड मिसप्लेस झाले तर या बँकेच्या अ‍ॅपच्या सहाय्याने कार्ड बंद केले जाऊ शकते. ऑनलाइन व्यवहारांबाबत ग्राहकांना सूचना मिळतील. या कार्डाची मर्यादा देखील निश्चित केली जाऊ शकते. कार्ड शिल्ड अंतर्गत Transactions Near You ची सुद्धा सुविधा मिळते.

('या' कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळेल 5 टक्के कॅशबॅक; जाणून घ्या, काय आहेत फीचर्स?)

Web Title: bank of india customers alert notice for termination of card shield application for debit card details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.