Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Alert : जर तुम्ही 'या' सरकारी बँकेचे ग्राहक असाल तर आधी हे काम करा, अन्यथा...

Bank Alert : जर तुम्ही 'या' सरकारी बँकेचे ग्राहक असाल तर आधी हे काम करा, अन्यथा...

bank of india notice for termination of card shield application for debit card : बँकेने डेबिट कार्ड शिल्ड अ‍ॅप्लिकेशनला बीओआय मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग अ‍ॅप्लिकेशनसह इंटिग्रेट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 05:26 PM2021-04-04T17:26:38+5:302021-04-04T17:39:28+5:30

bank of india notice for termination of card shield application for debit card : बँकेने डेबिट कार्ड शिल्ड अ‍ॅप्लिकेशनला बीओआय मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग अ‍ॅप्लिकेशनसह इंटिग्रेट केले आहे.

bank of india notice for termination of card shield application for debit card | Bank Alert : जर तुम्ही 'या' सरकारी बँकेचे ग्राहक असाल तर आधी हे काम करा, अन्यथा...

Bank Alert : जर तुम्ही 'या' सरकारी बँकेचे ग्राहक असाल तर आधी हे काम करा, अन्यथा...

Highlights21 एप्रिल 2021 पासून कार्ड शिल्ड अ‍ॅप्लिकेशन (Card Shield Application) काम करणार नाही.

मुंबई : जर तुम्ही बँक ऑफ इंडियाचे ( Bank of India) डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, 17 दिवसानंतर या सरकारी बँकेची खास सेवा बंद केली जाणार आहे. बँक ऑफ इंडियाने (BOI) आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, 21 एप्रिल 2021 पासून कार्ड शिल्ड अ‍ॅप्लिकेशन (Card Shield Application) काम करणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला आधीचे हे अ‍ॅप अपडेट करावे लागेल. जर तुम्ही असे न केल्यास, या अ‍ॅपद्वारे आपले डेबिट कार्ड नियंत्रित करू शकणार नाही. यासंदर्भातील माहिती बँकेने ट्विट करुन दिली आहे. (bank of india notice for termination of card shield application for debit card)

बँक ऑफ इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बँकेने डेबिट कार्ड शिल्ड अ‍ॅप्लिकेशन प्रदान केले आहे. ज्याद्वारे डेबिट कार्डधारक त्यांच्या डेबिट कार्डवर लक्ष आणि नियंत्रण ठेवू शकतात. बँकेने डेबिट कार्ड शिल्ड अ‍ॅप्लिकेशनला बीओआय मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग अ‍ॅप्लिकेशनसह इंटिग्रेट केले आहे.

याचबरोबर, बँकेने ट्विटमध्ये प्लेस्टोअर आणि अ‍ॅपस्टोरवरून बीओआय मोबाइल बँकिंग डाउनलोड करण्यासाठी एक लिंकही दिली आहे. ग्राहक इथून मोबाईलमध्ये बँकेचे मोबाइल बँकिंग अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात.

(ATM मधून फाटक्या नोटा आल्या तर करायचं काय? जाणून घ्या...)

21 एप्रिलपासून डेबिट कार्ड शिल्ड अ‍ॅप काम करणार नाही...
बँक म्हणाले की, डेबिट कार्ड शिल्ड वापरणार्‍या सर्व डेबिट कार्डधारकांना डेबिट कार्ड सर्व्हिस अ‍ॅपचा लाभ घेण्यासाठी मोबाईल बँकिंग अ‍ॅप्लिकेशन किंवा इंटरनेट बँकिंग डाऊनलोड करण्याची विनंती केली जाते. कार्ड शिल्ड अ‍ॅप 21 एप्रिल 2021 पासून उपलब्ध होणार नाही.

काय आहे कार्ड शिल्ड अ‍ॅपचा फायदा?
कार्ड शिल्डद्वारे ग्राहक आपल्या कार्डवर नियंत्रण ठेवू शकतो. डेबिट कार्ड कधी, कुठे, कसे वापरायचे हे ग्राहक या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने निर्णय घेऊ शकतात. जर तुमचे कार्ड हरवले तर या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने कार्ड बंद केले जाऊ शकते. ऑनलाईन व्यवहार झाल्यावर तुम्हाला याबद्दल सूचना (नोटिफिकेशन) मिळेल.

बँकेच्या वेबसाइटवर मिळेल माहिती
अधिक माहितीसाठी तुम्ही बँक ऑफ इंडियाच्या www.bankofindia.con.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता. तुम्ही टोल फ्री क्रमांकावर 1800 220 229/ 1800 103 1906 वर संपर्क साधू शकता. 

Web Title: bank of india notice for termination of card shield application for debit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.