Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेवटचे १८ दिवस बाकी! 'या' सरकारी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर त्वरा करा, नाहीतर...

शेवटचे १८ दिवस बाकी! 'या' सरकारी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर त्वरा करा, नाहीतर...

विलीनीकरणामुळे या बँकांचे चेकबुक आणि पासबुक येत्या १ एप्रिलपासून बदलणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 14:23 IST2021-03-13T14:22:03+5:302021-03-13T14:23:01+5:30

विलीनीकरणामुळे या बँकांचे चेकबुक आणि पासबुक येत्या १ एप्रिलपासून बदलणार आहेत.

bank merger if you have account in these govt banks then do these things before 1 april | शेवटचे १८ दिवस बाकी! 'या' सरकारी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर त्वरा करा, नाहीतर...

शेवटचे १८ दिवस बाकी! 'या' सरकारी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर त्वरा करा, नाहीतर...

सरकारी बँकांच्या खाजगीकरणाला विरोध करत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने (UFBU) दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. देशातील काही सरकारी बँकांचं याआधीच विलीनीकरण झालेलं आहे. तर काही बँकांचं अद्याप शिल्लक आहे. यात देना बँक, विजया बँक, कॉपोरेशन बँक, आंध्रा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक आणि इलाहबाद बँक या बँकांचं विलीनीकरण होणार आहे. विलीनीकरणामुळे या बँकांचे चेकबुक आणि पासबुक येत्या १ एप्रिलपासून बदलणार आहेत. त्यामुळे या बँकांचे तुम्ही जर ग्राहक असाल तर तुमच्याकडे नवं चेकबुक आणि पासबुक घेण्यासाठी शेवटचे १८ दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. 

बँकांच्या विलीनीकरणामुळे अकाऊंट नंबर, ब्रांचचा पत्ता, चेकबुक, पासबुकसह इतर अनेक गोष्टींमध्ये बदल होतो. अर्थात बँकेकडून याबाबत ग्राहकांना वेळोवेळी माहिती देखील देण्यात येते. पण तरीही तुम्ही अद्याप नवं पासबुक आणि चेकबुक घेतलं नसेल तर त्वरा करा कारण यासाठी केवळ शेवटचे १८ दिवस शिल्लक आहेत. 

बँकांकडून अलर्ट जारी
पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदाकडून याआधीच आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि देना बँकचे सध्याचे चेकबुक केवळ ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध राहणार आहेत. त्यामुळे या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावरही परिणाम होऊ शकतो. दरम्यान, कॅनरा बँकेनं सिंडिकेट बँकेशी विलीनीकरण झाल्यानंतरही ग्राहकांचं चेकबुक ३० जूनपर्यंत वैध राहणार असल्याचं याआधीच जारी केलं आहे. 

नेमकं काय अपडेट करावं लागणार?
जर तुमचं खातं वरील सरकारी बँकांमध्ये असल्यास १ एप्रिल पूर्वी तुम्हाला खात्याचे नॉमिनी डिटेल्स, पत्ता या गोष्टी अपडेट करुन घ्याव्या लागतील. त्याशिवाय, बँक तुम्हाला कोणतीही माहिती तुमच्या पत्त्यावर किंवा इमेलवर पाठवू शकणार नाही. सध्या सर्वच बँका सर्व माहिती मेल किंवा मोबाइल मेसेजच्या माध्यमातून ग्राहकांना देत असतात. त्यामुळे मोबाइल नंबर अपडेट असणं महत्वाचं आहे. 
 

Web Title: bank merger if you have account in these govt banks then do these things before 1 april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.