Lokmat Money > बिझनेस न्यूज > ... अन् बँक कधीच बंद झाली नाही, ATM मशिनबद्दल तुम्हाला हे माहित्येय का?

... अन् बँक कधीच बंद झाली नाही, ATM मशिनबद्दल तुम्हाला हे माहित्येय का?

एटीएम ऑटोमेटेड टेलर मशीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 04:51 PM2022-01-10T16:51:23+5:302022-01-10T16:51:54+5:30

एटीएम ऑटोमेटेड टेलर मशीन

bank never closed ... do you know about ATM | ... अन् बँक कधीच बंद झाली नाही, ATM मशिनबद्दल तुम्हाला हे माहित्येय का?

... अन् बँक कधीच बंद झाली नाही, ATM मशिनबद्दल तुम्हाला हे माहित्येय का?

आमची बँक सकाळी 9 वाजता उघडेल आणि कधीही बंद होणार नाही. न्यू यॉर्कच्या रस्त्यांवरील लागलेल्या या जाहिरातीने नागरिक आर्श्चयचकित झाले होते. झालेही तसेच. बँकेबाहेरएटीएम मशीन लागल्यानंतर लोक कोणत्याही वेळी बँकेतून पैसे काढू लागले. यामुळे बँकांच्या कामकाजाच्या वेळा संपल्या तरी व्यवहार मात्र 24 तास सुरू झाले. या एटीएमच्या निर्मितीमध्ये भारतातील शिलाँग येथे जन्मलेल्या जॉन शेफर्ड बॅरन यांचा मोठा वाटा होता.

जॉन शेफर्ड बॅरन
यांचा जन्म मेघालयातला. त्यांनी एटीएमची संकल्पना प्रत्यक्षात आली आणि जगातील बँकिंग स्वरूपच बदलून गेले.
आज एटीएम हे सर्वाधिक वापरले जाणारे बँकिंग साधन आहे.

अशी सुचली कल्पना
जॉन एकदा पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता थोडा उशीर झाल्याने बँक बंद झाली होती. तेव्हाच त्यांच्या मनात बँकेसाठी असे एखादे मशीन असावे की ज्यातून २४ तास कधीही पैसे काढता येतील अशी कल्पना समोर आली व त्यांनी ती एटीएमच्या रुपाने प्रत्यक्षातही उतरवली.

एटीएममध्ये पैसे नेमके कुठे असतात

१००, ५००, २०० आणि २००० रुपयांच्या नोटांसाठी एटीएममध्ये स्वतंत्र बॉक्स असतात. त्याला कॅसेट 
म्हटले जाते. 

एटीएमचे प्रकार
एटीएम मशीन कोणत्या प्रकारचे आहे हे माहित होण्यासाठी एटीएम मशीन वर विविध रंगांचे लेबल लावले जातात, त्यावरूनच  मशीनची ओळख पटते.

ऑफ साईट एटीएम
ऑफ साईट एटीएम हे कोणत्याही ठिकाणी स्थित असू शकते, मग त्या ठिकाणी बँक असो वा नसो. आपण दैनंदिन जीवनात ऑफ साईट एटीएमचा अधिक वापर करतो.

ब्राऊन लेबल एटीएम
ज्या मशीन वर ब्राऊन म्हणजेच तपकिरी रंगाचे लेबल असते, असे एटीएम कोणत्याही बँकेच्या मालकीचे नसते, तर ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ते भाडेतत्त्वावर घेतले जातात.

ऑनसाइट एटीएम
बँकेत किंवा बँकेच्या हद्दीत असलेल्या मशीनला ऑन साइट एटीएम मशीन असे म्हणतात. 

पिंक लेबल एटीएम
मशीनवर गुलाबी रंगाचे लेबल लावले तर असे एटीएम केवळ स्त्रियांसाठी आरक्षित असतात, म्हणजे यामधून केवळ महिला व्यवहार करू शकतात.

ग्रीन लेबल एटीएम
ग्रीन लेबल एटीएममशीन मधून केवळ शेती विषयक व्यवहार केले जाऊ जातात.

ऑरेंज लेबल एटीएम
ऑरेंज लेबलचा वापर शेअर व्यवहारांसाठी केला जातो. जसे की शेअर ट्रान्सफर करणे, अकाउंटमधील शेअर्स पाहणे इत्यादी.

व्हाइट लेबल एटीएम
हे एखाद्या सामान्य एटीएम प्रमाणेच असतात, परंतु यात कोणत्याही बँकेचे नाव किंवा सहभाग नसतो.

पिवळे एटीएम 
याद्वारे ई-कॉमर्स सेवा पुरवल्या जातात, म्हणजेच या एटीएमचा वापर करून आपण ऑनलाईन खरेदी आणि पेमेंटसाठी करू शकतो.

नोटांचा आकार, त्याची जाडी यानुसार या बॉक्सची रचना करण्यात येते. कॅसेटला असलेल्या सांकेतिक क्रमांकानुसार पैसे त्यामध्ये ठेवले जातात.
हे बॉक्स एटीएमवरील स्क्रीनमागे असलेल्या यंत्रणेमागे असलेल्या यंत्रणेवर कार्यरत होतात.

भारतात केव्हा आले एटीएम ?
१९८७मध्ये

कोणती बँक : एचएसबीसी
कुठे : मुंबई

१९९७ पर्यंत भारतात 
एटीएमची संख्या 
१५००

सध्या भारतात असलेल्या एटीएमची संख्या 
२ लाख १३ हजार १४५

सध्या जगात असलेल्या एटीएमची संख्या
३ कोटींहून अधिक

जगातील पहिली एटीएम 
२७ जून १९६७
ठिकाण : लंडन
निर्माता : जॉन शेफर्ड बॅरन
बार्कलेज बँकेत ही मशीन बसवण्यात आली.
या मशिनद्वारे ग्राहक एकावेळी केवळ १० पाऊंड इतके पैसे काढू शकत होते. 

नोटांचा आकार, त्याची जाडी यानुसार या बॉक्सची रचना करण्यात येते. कॅसेटला असलेल्या सांकेतिक क्रमांकानुसार पैसे हे बॉक्स एटीएम

१९७७ 
मध्ये अमेरिकेतील नॅशनल कॅशरजिस्टर कंपनीने एटीएम मशीनचे सुधारित मॉडेल तयार केले. यात बँक ग्राहकांना २४ तास आपली पुरवू शकत होत्या.

१९८० 
मध्ये पुन्हा एक ५०७० हे मॉडेल तयार करण्यात आलेे. ते वापरण्यास सोपे होते. यामुळे ते लोकांच्या पसंतीस उतरले. यानंतर एटीएम मशीनला संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळाली आणि त्यांची संख्या वाढत गेली.

अशीही असतात एटीएम..

भारतात एटीएमच्या कोणत्याही प्रकाराला साधारण एटीएम म्हणूनच ओळखले 
इतर देशात मात्र एटीएमची आणखी काही नावे असतात. जसे की, कॅश पॉईंट, कॅश मशीन, ऑटोमेटेड बँकिंग मशीन, मनी मशीन, बँक मशीन, बँकोमॅट
संयुक्त अरब अमिरातीच्या आबुधाबीच्या अमीरात हॉटेलमध्ये सोने देणारे एटीएम मशीन आहे. त्यातून शेकडो प्रकारच्या सोन्याच्या वस्तू मिळू शकतात.

 

 

Web Title: bank never closed ... do you know about ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.