Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी खुशखबर, कार लोन स्वस्त, व्याजदर कपातीची घोषणा

Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी खुशखबर, कार लोन स्वस्त, व्याजदर कपातीची घोषणा

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाने कार कर्जावरील (Car Loan) व्याजदरात कपात केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 05:38 PM2024-02-27T17:38:54+5:302024-02-27T17:49:24+5:30

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाने कार कर्जावरील (Car Loan) व्याजदरात कपात केली आहे. 

Bank of Baroda cuts interest rates on car loans by 65 bps | Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी खुशखबर, कार लोन स्वस्त, व्याजदर कपातीची घोषणा

Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी खुशखबर, कार लोन स्वस्त, व्याजदर कपातीची घोषणा

नवी दिल्ली : जर तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑफर घेऊन आली आहे. बँक ऑफ बडोदाने कार कर्जावरील (Car Loan) व्याजदरात कपात केली आहे. 

सोमवारी (26 फेब्रुवारी) बँक ऑफ बडोदाने कार कर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. बँक ऑफ बडोदाने नवीन दर 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. बँक ऑफ बडोदाने कार कर्जाचे दर 0.65 टक्क्यांनी कमी केले आणि आता दर 9.4 टक्क्यांवरून 8.75 टक्क्यांवर आले आहेत. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. त्यामुळे तुम्ही 31 मार्चपर्यंत स्वस्त कार कर्जाचा लाभ घेऊ शकता. 

या ऑफरअंतर्गत प्रक्रिया शुल्कातही सूट जाहीर करण्यात आली आहे. शेअर मार्केट बंद झाल्यानंतर बँक ऑफ बडोदाने या ऑफरची माहिती दिली. बँक ऑफ बडोदाच्या मते, ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे. हे दर 26 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत लागू असतील. हे दर नवीन कार खरेदीवर आहेत. हे कार कर्ज घेणाऱ्याच्या क्रेडिट प्रोफाइलवरही अवलंबून असेल की, त्याला कार कर्ज कोणत्या दराने मिळेल.

निश्चित व्याज दर सुद्धा घोषित
याचबरोबर, बँक ऑफ बडोदा कार कर्जावर निश्चित व्याज दर देखील ऑफर करते, जे 8.85 टक्क्यांपासून सुरू होते. याशिवाय, फ्लोटिंग आणि निश्चित दर पर्यायांवरील प्रक्रिया शुल्कावर सवलत असणारआहे. हे कर्ज जास्तीत जास्त 84 महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाईल.

Web Title: Bank of Baroda cuts interest rates on car loans by 65 bps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankcarबँककार