नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा (BoB) तुम्हाला स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी देत आहे. बँकेतर्फे मेगा ई-लिलाव (Mega e-Auction) आयोजित करण्यात येत आहे. बँकेच्या या मेगा लिलावात तुम्हाला फ्लॅट, घर, ऑफिस स्पेस, प्लॉट आणि औद्योगिक प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार स्वस्त आणि चांगली प्रॉपर्टी घेऊ शकता.
बँकेचा हा लिलाव 19 एप्रिल रोजी होणार आहे. या लिलावात कोणीही बोली लावू शकतो. या लिलावात विक्री झालेल्या प्रॉपर्टीचा ताबा लवकरात लवकर ग्राहकांना मिळेल. याशिवाय, जर तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते तुम्हाला कमी व्याजदरात सहज मिळेल.
बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता तुम्ही रिअल इस्टेटमध्ये सहज गुंतवणूक करू शकता. बँक ऑफ बडोदा तुम्हाला ही संधी देत आहे. बँकेतर्फे 19 एप्रिल रोजी मेगा ई-लिलाव करण्यात येत आहे. या लिलावात तुम्ही तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी खरेदी करू शकता.
Ab real estate me invest karein with ease #BankofBaroda ke saath. Mega e-Auction mein participate karein on 19.04.2022 aur apni dream property ko apna banayein.
— Bank of Baroda (@bankofbaroda) April 12, 2022
Know more https://t.co/VEiwLeh0aW#AzadiKaAmritMahotsav@AmritMahotsavpic.twitter.com/aJkRXlBzKQ
तपासा अधिकृत लिंक
बँकेच्या या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत लिंक bit.ly/MegaEAuctionApril ला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला एप्रिल महिन्यात होणाऱ्या लिलावाची माहिती मिळेल. याशिवाय, कोणत्या शहरात किती घरे आहेत ते पाहता येईल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही शहरासाठी बोली लावू शकता.
कोणत्या प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो?
दरम्यान, अनेक लोक प्रॉपर्टीसाठी बँकेकडून कर्ज घेतात, परंतु काही कारणास्तव ते कर्ज फेडू शकत नाहीत, तर त्या सर्व लोकांची जमीन किंवा प्लॉट बँक ताब्यात घेते. अशा प्रॉपर्टींचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.