Lokmat Money > बिझनेस न्यूज > BoB ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने सुरु केली 'ही' खास सुविधा

BoB ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने सुरु केली 'ही' खास सुविधा

BoB World : आता तुमचे सर्व काम तुमच्या फोनवरून फक्त एका मिनिटात होईल. बँक ऑफ बडोदाच्या या सुविधेचे नाव bob world आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:07 PM2022-03-21T18:07:45+5:302022-03-21T18:08:35+5:30

BoB World : आता तुमचे सर्व काम तुमच्या फोनवरून फक्त एका मिनिटात होईल. बँक ऑफ बडोदाच्या या सुविधेचे नाव bob world आहे.

bank of baroda gives facility to open fd and rd in one minute bob world app | BoB ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने सुरु केली 'ही' खास सुविधा

BoB ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने सुरु केली 'ही' खास सुविधा

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) खाते असलेल्या ग्राहकांसाठी बँकेने एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही काही मिनिटांत एफडी (FD) किंवा आरडी (RD) उघडू शकता. आता तुम्हाला मुदत ठेवी घेण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. यासोबतच तुम्हाला काही लांबलचक फॉर्म भरावा लागणार नाही. 

आता तुमचे सर्व काम तुमच्या फोनवरून फक्त एका मिनिटात होईल. बँक ऑफ बडोदाच्या या सुविधेचे नाव bob world आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत ट्विटरवर लिहिले आहे की, आता तुम्ही FD आणि RD मध्ये डिजिटल गुंतवणूक करू शकता. बँक ऑफ बडोदा अॅपच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत FD आणि RD खाते उघडू शकता.

काही मिनिटांत करू शकता  FD आणि RD
बँक ऑफ बडोदाने आपल्या ट्विटमध्ये एक फोटो देखील एम्बेड केला आहे. या फोटोमध्ये लिहिले आहे की, bob world च्या जगात तुम्ही चालता-फिरता  FD आणि RD उघडू शकता. याशिवाय तुम्ही वेल्थ क्रिएशन निर्माण करू शकता. याशिवाय, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही FD आणि RD बंद करू शकता. तसेच तुम्ही ई-रिसिप्ट बघू शकता.

ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या...
बँक ऑफ बडोदाच्या  bob world बद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट bobworld.com ला भेट देऊ शकता.
 

Web Title: bank of baroda gives facility to open fd and rd in one minute bob world app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.