Join us

BoB ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने सुरु केली 'ही' खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 6:07 PM

BoB World : आता तुमचे सर्व काम तुमच्या फोनवरून फक्त एका मिनिटात होईल. बँक ऑफ बडोदाच्या या सुविधेचे नाव bob world आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) खाते असलेल्या ग्राहकांसाठी बँकेने एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही काही मिनिटांत एफडी (FD) किंवा आरडी (RD) उघडू शकता. आता तुम्हाला मुदत ठेवी घेण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. यासोबतच तुम्हाला काही लांबलचक फॉर्म भरावा लागणार नाही. 

आता तुमचे सर्व काम तुमच्या फोनवरून फक्त एका मिनिटात होईल. बँक ऑफ बडोदाच्या या सुविधेचे नाव bob world आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत ट्विटरवर लिहिले आहे की, आता तुम्ही FD आणि RD मध्ये डिजिटल गुंतवणूक करू शकता. बँक ऑफ बडोदा अॅपच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत FD आणि RD खाते उघडू शकता.

काही मिनिटांत करू शकता  FD आणि RDबँक ऑफ बडोदाने आपल्या ट्विटमध्ये एक फोटो देखील एम्बेड केला आहे. या फोटोमध्ये लिहिले आहे की, bob world च्या जगात तुम्ही चालता-फिरता  FD आणि RD उघडू शकता. याशिवाय तुम्ही वेल्थ क्रिएशन निर्माण करू शकता. याशिवाय, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही FD आणि RD बंद करू शकता. तसेच तुम्ही ई-रिसिप्ट बघू शकता.

ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या...बँक ऑफ बडोदाच्या  bob world बद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट bobworld.com ला भेट देऊ शकता. 

टॅग्स :बँकगुंतवणूक