नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक ऑफ बडोदाने पुन्हा एकदा कर्ज महाग केले आहे. बँक ऑफ बडोदाने एमसीएलआर (Marginal Cost Of Lending Rates) मध्ये वाढ केली आहे. बँकेने आपल्या एमएलसीआरमध्ये ( MLCR) 10 ते 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या या निर्णयामुळे गृहकर्ज घेणे महाग होणार आहे. तसेच, ज्या ग्राहकांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे, त्यांचा ईएमआय अधिक महाग होईल.
12 जुलैपासून एका वर्षाच्या कालावधीत एमएलसीआर 7.50 टक्क्यांवरून 7.65 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे, 6 महिन्यांच्या कालावधीसाठी एमएलसीआर 7.35 टक्क्यांवरून 7.45 टक्के झाला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत एमएलसीआर 7.25 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एक महिना आणि ओव्हरनाइट कालावधीच्या एमएलसीआरमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, बँक ऑफ बडोदाचा रेपो लिंक्ड लेंडिंग दर 7.45 टक्के आहे. कर्मचारी नसलेल्या सदस्यांसाठी गृहकर्जाचा दर 7.45 टक्के ते 8.80 टक्के आहे. तर कर्मचारी सदस्यांसाठी गृहकर्जाचा दर 7.45 टक्के आहे. बँक ऑफ बडोदाचे कार कर्ज सध्या 7.70 टक्क्यांपासून ते 10.95 टक्क्यांदरम्यान आहे.
इतर बँकांनीही वाढवला आहे एमसीएलआर!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी एमसीएलआर वाढवून ग्राहकांना कर्ज घेणे महाग केले आहे. कॅनरा बँकेपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अॅक्सिस बँक यासह इतर अनेक बँकांनी आपला एमसीएलआर वाढवला आहे.