नवी दिल्ली : देशातील सरकारी बँक (Government Bank) तुम्हाला दिवाळीपूर्वी (Diwali 2022) स्वस्त प्रॉपर्टी खरेदी (Buy Cheap Property) करण्याची संधी देत आहे. तुम्हीही दिवाळीत घर घेण्याचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) तुम्हाला स्वस्त घर खरेदी करण्याची संधी देत आहे. दरम्यान, बँक ऑफ बडोदाच्या या लिलावामध्ये तुमच्यासाठी रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल, अॅग्रिकल्चर प्रॉपर्टीचा समावेश आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीसाठी बोली लावू शकता.
बँकेकडून ट्विटबँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, स्मार्ट गुंतवणूक म्हणजे तुमचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणे. तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने मेगा ई-लिलावात सहभागी होऊ शकता. हा लिलाव 18 ऑक्टोबर 2022 रोजी बँकेद्वारे केला जाईल.
बेस्ट रेट्समध्ये चांगली प्रॉपर्टी सरकारी बँकेच्या या लिलावात तुम्हाला उत्तम दरात चांगली प्रॉपर्टी मिळू शकते. तसेच, हा लिलाव सरफेसी कायद्यांतर्गत ( SARFAESI Act) केला जाईल, तर तो पूर्णपणे पारदर्शक असणार आहे.
वेळोवेळी प्रॉपर्टींचा लिलावदेशातील अनेक सरकारी बँका वेळोवेळी प्रॉपर्टींचा लिलाव करत असतात. बँकेच्या वतीने ई-लिलावात एनपीएच्या यादीत आलेल्या प्रॉपर्टीची विक्री केली जाते. म्हणजेच ज्या प्रॉपर्टीवर त्यांच्या मालकांनी कर्ज घेतल्यानंतर बँकेची थकबाकी भरली नाही. बँक अशा लोकांच्या प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेऊन तिचा लिलाव करते.
अधिकृत लिंक पाहू शकताबँक ऑफ बडोदाच्या या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही bit.ly/MegaEAuctionOctober या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या लिलावाची संपूर्ण माहिती मिळू शकेल.