Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank of Baroda च्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल; जाणून घ्या किती होईल फायदा?

Bank of Baroda च्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल; जाणून घ्या किती होईल फायदा?

bank of baroda : मुदत ठेवींवरील सुधारित दर आजपासून म्हणजेच 17 मार्चपासून लागू झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 05:35 PM2023-03-17T17:35:24+5:302023-03-17T17:36:03+5:30

bank of baroda : मुदत ठेवींवरील सुधारित दर आजपासून म्हणजेच 17 मार्चपासून लागू झाले आहेत.

bank of baroda revised fd interest rates senior citizens to get up to 7.55 percent interest | Bank of Baroda च्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल; जाणून घ्या किती होईल फायदा?

Bank of Baroda च्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल; जाणून घ्या किती होईल फायदा?

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींच्या (FD) व्याजदरात बदल केले आहेत. सामान्य लोकांसाठी मुदत ठेवींवरील व्याज दर 7.05 टक्के असणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना बँक ऑफ बडोदामध्ये मुदत ठेवींवर 7.55 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकतात. मुदत ठेवींवरील सुधारित दर आजपासून म्हणजेच 17 मार्चपासून लागू झाले आहेत. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत आरबीआयने रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढवला आहे. आरबीआय एप्रिल एमपीसीमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

बँक ऑफ बडोदा मुदत ठेवींवरील सुधारित दर 
- सात दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर गुंतवणूकदारांना 3 टक्के व्याज मिळेल.
- 46 दिवस ते 180 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.5 टक्के व्याज मिळेल.
- 181 दिवस ते 210 दिवसांच्या मुदत ठेवीवर 5.25 टक्के व्याज मिळेल.
- 211 दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीवर 5.75 टक्के व्याज दिले जाईल.
- एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.75 टक्के व्याज मिळेल.
- तीन वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.5 टक्के व्याज मिळेल.
- 444 दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर 6.75 टक्के व्याज मिळेल.
- 555 दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर 6.75 टक्के व्याज मिळेल.
- 399 दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर 7.05 टक्के व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांना मिळेल इतके व्याज 
- सात दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर गुंतवणूकदारांना 3.5 टक्के व्याज मिळेल.
- 46 दिवस ते 180 दिवसांच्या मुदत ठेवीवर 5 टक्के व्याज मिळेल.
- 181 दिवस ते 210 दिवसांच्या मुदत ठेवीवर 5.75 टक्के व्याज दिले जाईल.
- 211 दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीवर 6.25 टक्के व्याज मिळेल.
- एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 7.25 टक्के व्याज मिळेल.
- तीन वर्षे ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.15 टक्के व्याज मिळेल.
- तीन वर्षे ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.15 टक्के व्याज मिळेल.
- 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 7.50 टक्के व्याज मिळेल.
- 444 दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर 7.25 टक्के व्याज मिळेल.
- 555 दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर 7.25 टक्के व्याज मिळेल.
- 399 दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर 7.55 टक्के व्याज मिळेल.

Web Title: bank of baroda revised fd interest rates senior citizens to get up to 7.55 percent interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.