बँक ऑफ बडोदानं (BoB) ६० हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ११ एजीएम (असिस्टंट जनरल मॅनेजर्स) आहेत. एका बँकेच्या कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार एजीएम स्तरावरील अधिकारी हे स्केल फाइव्ह अधिकारी असतात जे सहसा एरिया मॅनेजर, झोनल हेड आणि २५ पेक्षा अधिक ब्रान्च हेडची कमान सांभाळतात.
Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; RBI ची मोठी अॅक्शन, पाहा डिटेल्स
ही बाब बँकेच्या BoB वर्ल्ड अॅपच्या ऑडिटशी संबंधित आहे. निलंबनाच्या पत्रात बँकेने गंभीर स्वरुपात अनियमितता झाल्याचं मान्य केलं आहे. मनी कंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलंय. काही कर्मचार्यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्राहकांच्या खात्यातील नंबर फिड केले आणि नंतर BOB वर्ल्ड अॅपमध्ये रजिस्ट्रेशन-डिरजिस्ट्रेशन केलं आणि हे सर्व ग्राहकांच्या संमतीशिवाय घडल्याचं सांगण्यात येत आहे.
तपासानंतर झाली कारवाई
बँकेचं म्हणणं आहे की काही कर्मचाऱ्यांनी जे काही केले ते प्रथमदर्शनी कमिशन आणि ओमिशनचं प्रकरण होतं, ज्यासाठी विभागीय चौकशी करण्यात आली. विभागीय चौकशीअंती अनियमितता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणं योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. एका सूत्रानं मनीकंट्रोलला सांगितलं की, निलंबित करण्यात आलेले बहुतांश कर्मचारी हे बडोदा या भागातील आहेत. बँक आता लखनौ, भोपाळ, राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही झोनमध्ये अशीच कारवाई करू शकते.
एक तृतीयांश वेतन मिळणार
बँकेनं ११ एजीएमसह ६० हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. एका सूत्रानं मनीकंट्रोलला सांगितलं की, निलंबनाच्या काळात त्यांना फक्त एक तृतीयांश पगार मिळेल. जर बँकेला ते दोषी आढळले तर त्यांना दंडात्मक पोस्टिंग मिळू शकतं किंवा त्याची नोकरीही जाऊ शकते. दोषी आढळले नाही तर बँक निलंबन कालावधीसाठी भरपाई वेतन देईल, असं एका निलंबित कर्मचाऱ्यानं सांगितलं.