Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, लवकरच करावा लागेल अर्ज! 

सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, लवकरच करावा लागेल अर्ज! 

Bank Recruitment : या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 05:22 PM2022-07-07T17:22:18+5:302022-07-07T17:22:46+5:30

Bank Recruitment : या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करू शकतात.

Bank Of Baroda SO Recruitment 2022 Last Date Near For 226 Posts Apply At Bankofbaroda.In Sarkari Naukri Bank | सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, लवकरच करावा लागेल अर्ज! 

सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, लवकरच करावा लागेल अर्ज! 

नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल आणि बँकेतनोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदाने (BOB) अनेक स्पेशलिस्ट ऑफिसरच्या (SO) रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करू शकतात.

बँक ऑफ बडोदा स्पेशालिस्ट ऑफिसर (BoB SO) भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2022 आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने उमेदवार बँक नोकऱ्यांसाठी अर्ज करतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज पूर्ण करावेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये जमा करावे लागतील. तसेच, एससी, एसटी, महिला आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील.

बँक ऑफ बडोदामध्ये जारी करण्यात आलेल्या भरतीसाठी एकूण 325 रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी 75 जागा रिलेशनशिप मॅनेजर SMG/SIV साठी, 100 जागा रिलेशनशिप मॅनेजर MMG/SIII साठी, 100 क्रेडिट अॅनालिस्ट MMG/SIII साठी आणि 50 क्रेडिट अॅनालिस्ट MMG/SII साठी आहेत. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा जीडी/मुलाखतीद्वारे केली जाईल.

शैक्षणिक पात्रता
रिलेशनशिप मॅनेजर : पदवी आणि फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा एक वर्षाचा डिप्लोमा.
क्रेडिट विश्लेषक (MMG/SIII): पदवी आणि फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा CA/CMA/CS/CFA
क्रेडिट विश्लेषक (MMG/SII): पदवी आणि CA.

कसा करावा अर्ज?
- सर्वात आधी www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- आता होम पेजवर दिसणार्‍या वCurrent Opportunities च्या सेक्शनमध्ये जा.
- आता संबंधित भरतीच्या Apply Online Link वर क्लिक करा.
- त्यानंतर आता तुमचा अर्ज भरा.
- अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
- अर्ज डाऊनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी प्रिंट आउट घ्या.

Web Title: Bank Of Baroda SO Recruitment 2022 Last Date Near For 226 Posts Apply At Bankofbaroda.In Sarkari Naukri Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.