Join us

Cheap Property: स्वस्तात खरेदी करा फ्लॅट-घर आणि दुकान, 'ही' सरकारी बँक देतेय खास संधी; दिल्ली-मुंबईसह या शहरांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 9:29 AM

आपण यात, 1000 हून अधिक प्रॉपर्टीसाठी बोली लावू शकता. आपल्याला रेसिडेन्शिअल, कॉमर्शिअल, अॅग्रीकल्चर, फ्लॅट आणि ओपन साईटसह सर्व प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी आहे.

जर आपणही स्वस्तात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. यावेळी आपण स्वस्तात घर खरेदी करू शकता. यात आपल्याला रेसिडेन्शिअल, कॉमर्शिअल, अॅग्रीकल्चर, फ्लॅट आणि ओपन साईटसह सर्व प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी आहे. महत्वाचे म्हणजे आपण यात, 1000 हून अधिक प्रॉपर्टीसाठी बोली लावू शकता. यासंदर्भात बँक ऑफ इंडियाकडून ई-लिलाव सुरू करण्यात येत आहे, यात आपण स्वस्तात मालमत्ता खरेदी करू शकता.

बँक ऑफ इंडियाने केले ट्विट -बँक ऑफ इंडियाने आपल्या ऑफिशिअल ट्विटमध्ये लिहिले आहे, ई-नीलामी! स्वस्त किंमतीत आकर्षक मालमत्ता! मालमत्तेच्या तपशीलासाठी, कृपया नमूद केलेल्या लिंकवर क्लिक करा. महत्वाचे म्हणजे, आपल्याला स्वस्त दरात चांगल्या मालमत्ता खरेदीची संधी मिळत आहे.

या शहरांत खरेदी करू शकता प्रॉपर्टी -या ऑक्शनमध्ये आपल्याला बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसह अनेक मोठ्या शहरांत प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यासाठी आपण 9 सप्टेंबरला बोली लावू शकता. 

ऑफिशिअल लिंक तपासा - इस ऑक्शन अथवा लिलावाच्या अधिक माहितीसाठी आपण ऑफिशियल लिंक https://bankofindia.co.in/web/guest/home वरही  विझिट करू शकता. आपल्याला येथे सर्व प्रकारची माहिती मिळेल.

कोणत्या प्रॉपर्टीचा होतो लिलाव - बरेच लोक प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी बँकेकडून कर्ज घेत असतात. मात्र, यातील काही लोक, काही कारणांमुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. अशा सर्व लोकांच्या जमिनी अथवा प्लॉट बँका आपल्या ताब्यात घेतात. यानंतर बँकांकडून वेळो-वेळी अशा प्रकारच्या प्रापर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावात बँका प्रापर्टी विकून दिलेल्या कर्जाची वसूल करतात. 

टॅग्स :बँक ऑफ इंडियाबँकमुंबईसुंदर गृहनियोजनगुंतवणूक