Lokmat Money > बिझनेस न्यूज > Home Loan : होमलोन घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! वाढत्या व्याजदरात 'या' सरकारी बँकेने व्याजदर केले कमी

Home Loan : होमलोन घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! वाढत्या व्याजदरात 'या' सरकारी बँकेने व्याजदर केले कमी

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे, त्यामुळे आता कर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 04:56 PM2023-03-12T16:56:45+5:302023-03-12T16:57:14+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे, त्यामुळे आता कर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ झाली आहे.

bank of maharashtra cuts home loan rate to 8 point 4 percent great opportunity to buy house on cheap rates | Home Loan : होमलोन घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! वाढत्या व्याजदरात 'या' सरकारी बँकेने व्याजदर केले कमी

Home Loan : होमलोन घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! वाढत्या व्याजदरात 'या' सरकारी बँकेने व्याजदर केले कमी

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केली आहे, त्यामुळे आता कर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ झाली आहे. देशातील सर्वच बँकांनी गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. या पार्श्वभूमीवर आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एका सरकारी बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहे. 

आरबीआयने रेपो दरात सातत्याने वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनी कर्जाचे दर वाढवले ​​आहेत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्जावरील व्याजदर सध्याच्या ८.६ टक्क्यांवरून ८.४ टक्क्यांवर आणला आहे. 

एलआयसीच्या या खास पॉलिसीत मिळतो 7 पट परतावा, खर्चही कमी; चेक करा ऑफर

या संदर्भात बँकेने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.  नवीन दर १३ मार्च २०२३ पासून लागू होतील. हे गृहकर्ज ८.४ टक्के व्याजदरासह बँकिंग क्षेत्रातील सर्वात स्वस्त गृहकर्जांपैकी एक आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र संरक्षण व्यक्तींसह निमलष्करी दलांसाठी विशेष व्याज दर देखील देऊ करत आहे, ज्याचा लाभ पगारदार व्यक्ती आणि निवृत्तीवेतनधारक घेऊ शकतात. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कही माफ केले आहे. ही बँक आता गृहकर्ज, कार लोन आणि गोल्ड लोनवर कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारणार नाही.

गेल्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानेही गृहकर्जाचा व्याजदर ०.४० टक्क्यांनी कमी करून ८.५ टक्के केला होता. बँकेने एमएसएमई कर्जावरील व्याजदरही कमी केले आहेत. बँक एमएसएमई कर्जावर ८.४ टक्के दराने व्याज आकारण्यास सुरुवात करेल. 

Web Title: bank of maharashtra cuts home loan rate to 8 point 4 percent great opportunity to buy house on cheap rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.