Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Privatisation: लवकरच 'या' मोठ्या सरकारी बँकेच्या खाजगीकरण होणार, 'ही' कंपनी लावणार बोली...

Bank Privatisation: लवकरच 'या' मोठ्या सरकारी बँकेच्या खाजगीकरण होणार, 'ही' कंपनी लावणार बोली...

Bank Privatisation: लवकरच एक सरकारी बँक खाजगी होणार आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 08:06 PM2022-10-14T20:06:05+5:302022-10-14T20:06:24+5:30

Bank Privatisation: लवकरच एक सरकारी बँक खाजगी होणार आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली होती.

Bank Privatisation: Soon 'IDBI' bank will be privatised, 'Shree Ram Finance' company will bid | Bank Privatisation: लवकरच 'या' मोठ्या सरकारी बँकेच्या खाजगीकरण होणार, 'ही' कंपनी लावणार बोली...

Bank Privatisation: लवकरच 'या' मोठ्या सरकारी बँकेच्या खाजगीकरण होणार, 'ही' कंपनी लावणार बोली...

Bank Privatisation News:बँकांच्या खाजगीकरणासाठी सरकार वेगाने काम करत आहे. लवकरच एक सरकारी बँकेचे खाजगीकरण होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबत माहिती दिली होती. देशाच्या बँकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार अनेक बदल करत आहे. IDBI बँकेच्या खाजगीकरणासाठी मार्चपर्यंत निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) कडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार आणि LIC, IDBI बँकेतील सुमारे 60.72 टक्के हिस्सा विकत आहेत. त्यांच्याकडे बँकेचा 94.72 टक्के हिस्सा आहे

मार्चपर्यंत निविदा मागवल्या जातील
सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम ग्रुप आयडीबीआय बँकेसाठी बोली लावणार आहे. मार्चपर्यंत निविदा मागवण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. श्रीराम ग्रुप लवकरच यासाठी ईओआय सादर करू शकेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीराम ग्रुप एक फायनान्सर आहे, ज्याचे मुख्यालय चेन्नईमध्ये आहे. सध्या, हा समूह IDBI बँकेच्या खाजगीकरणात सहभागी होण्यासाठी स्वतंत्र होल्डिंग कंपनी स्थापन करू शकतो.

श्रीराम ग्रुपचा व्यवसाय काय आहे?
आर त्यागराजन यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम समूह सध्या व्यावसायिक वाहन वित्तपुरवठा, दुचाकी वित्तपुरवठा तसेच लहान आणि मध्यम व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत आहे. श्रीराम समूह IDBI बँकेसाठी प्रयत्नशील आहे. आयडीबीआय बँकेचे दोन टप्प्यात खाजगीकरण करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. प्रथम ईओआय सादर केले जातील. यानंतर RBI खाजगीकरण प्रक्रियेतील सहभागींच्या पात्रतेचे मूल्यांकन करेल आणि त्यांना नियामकाची "योग्य की अयोग्य" चाचणी उत्तीर्ण करुन सरकारी मंजुरी मिळवावी लागेल.

Web Title: Bank Privatisation: Soon 'IDBI' bank will be privatised, 'Shree Ram Finance' company will bid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.