Join us

बँक रिकॅप बाँड्स पुढील पंधरवड्यात बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:57 PM

नागपूर : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २१ सरकारी बँकांना २.११ लाख कोटी नवे भांडवल पुरविण्याची घोषणा केली होती.

सोपान पांढरीपांडेनागपूर : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २१ सरकारी बँकांना २.११ लाख कोटी नवे भांडवल पुरविण्याची घोषणा केली होती. यापैकी १.३५ लाख कोटी सरकार बाजारातून कर्जरोख्यांद्वारे उभारणार आहे. हे कर्जरोखे पुढील १५ दिवसांत बाजारात येणार आहेत.त्यांना बँक रिकॅप बाँड्स असे नाव असेल, त्यावर दरवर्षी सात टक्के व्याज मिळेल. परतफेडीचा काळ १० वर्षे असेल. या रोख्यांमधून सरकारला १.३५ लाख कोटी मिळतील. सरकारी बँकांना भांडवल म्हणून दिले जातील. बँकांसाठी सरकारने १८,००० कोटींची तरतूद २०१७-१८ मध्ये केली आहे. उरलेले ५८,००० कोटी बँका समभागाद्वारे उभे करतील. यावर्षी बँकांना २.११ लाख कोटी नवे भांडवल मिळेल. रिझर्व्ह बँकेकडून सरकारला २०१५-१६ मध्ये ६५,८७६ कोटी लाभांश मिळाला. पण नोटाबंदीमुळे आरबीआयला नोटाछपाईवर ३०,००० कोटी खर्च आल्याने २०१६-१७ मध्ये ३०,६५९ कोटी लाभांश मिळाला. त्यामुळे कर्जरोख्यांमधून अधिक रक्कम उभारावी लागत आहे.>७४ हजार कोटींचा लाभांशचालू वर्षात (२०१७-१८) मध्ये सर्व बँकांकडून ७४,९०१ कोटी सरकारला लाभांश मिळेल व त्यापैकी ५८,००० कोटी केवळ रिझर्व्ह बँकेकडून मिळतील, अशी अपेक्षाही आहे.

टॅग्स :अरूण जेटली