नवी दिल्ली- बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 डिसेंबरनंतर 5 दिवस बँका बंद राहणार असल्यानं 20 तारखेच्या आधीच आपण बँकांमधील कामं उकरून घ्यावीत. या संपामुळे 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद ठेवण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात असून, बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दाही या संपाच्या केंद्रस्थानी असणार आहे. 21 डिसेंबरला शुक्रवार असून, त्याच दिवसापासून बँकांनी संपाची घोषणा केली आहे. 22 आणि 23 डिसेंबरला शनिवार, रविवार असल्यानं बँकांना सुट्टीच राहणार आहे.
25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्यानं बँका बंद राहणार आहेत. तर 26 डिसेंबरपासून युनायटेड फोरमने पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकांची कामं लवकरात लवकर उरकून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऐन वेळी पैशांची चणचण भासणार नाही.
बँका पाच दिवस राहणार बंद, आजच उरकून घ्या सर्व कामे...
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 08:52 AM2018-12-14T08:52:12+5:302018-12-14T08:52:54+5:30
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Highlights ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संप पुकारण्याचा निर्णय घेतला येत्या 20 डिसेंबरनंतर 5 दिवस बँका बंद राहणार असल्यानं 20 तारखेच्या आधीच आपण बँकांमधील कामं उकरून घ्यावीत.या संपामुळे 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद ठेवण्यात येणार आहेत.